भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. पंजाब आणि बडोदा यांच्या दरम्यान झालेल्या या अंतिम सामन्यात पंजाब संघाने 20 धावांनी विजय मिळवत स्पर्धा आपल्या नावे केली. अष्टपैलू अभिषेक शर्मा याला स्पर्धेचा मानकरी तर, अंतिम सामन्यात शतक झळकावणारा अनमोलप्रीत सिंग याला सामनावीर पुरस्कार मिळाला.
आय.एस बिंद्रा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, शानदार फॉर्ममध्ये असलेला अभिषेक शर्मा व प्रभसिमरन हे अनुक्रमे शून्य व नऊ धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार मनदीप सिंग व अनमोलप्रीत सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. मनदीप 32 भावांवर बाद झाल्यावर अनमोलप्रीत याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
अर्धशतकानंतर त्याने आक्रमक धोरण स्वीकारले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नेहल वढेरा याने पहिल्या चेंडूपासून तुफानी फटकेबाजी सुरू केली. दोघांनी बडोद्याच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. वढेरा याने केवळ 27 चेंडूंमध्ये 61 धावांची तुफानी केली. तर, अनमोलप्रीत याने अंतिम सामन्यात 58 चेंडूत शतक पूर्ण केले. त्यामुळे पंजाब ने 223 धावा उभ्या केल्या.
या धावांचा पाठलाग करताना बडोदा संघाला रथवा, कर्णधार कृणाल पंड्या व अभिमन्यू राजपूत यांनी शानदार फलंदाजी करत अठराव्या षटकापर्यंत सामन्यात कायम ठेवले होते. मात्र, पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने तीन बळी मिळवत बडोद्याच्या डावाला वेसण घातली. त्यामुळे पंजाब संघाने वीस धावांनी विजय साजरा केला. पंजाब संघाचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.
(Punjab Wins Syed Mushtaq Ali Trophy 2023 Beat Baroda In Final)
महत्वाच्या बातम्या –
“तुला लाज वाटायला हवी”, मॅथ्यूजला Time Out पद्धतीने बाद दिल्यावर शाकिब नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
काय आहे टाईम आऊट नियम, ज्यात दिग्गज अँजेलो मॅथ्यूजही फसला; वाचा सविस्तर