पुणे, दि. 14 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात निखिल लुणावत(111धावा) याने केलेल्या संयमपूर्ण फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने 22 यार्डस संघापुढे 278 धावांचे आव्हान उभे केले.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या दोन दिवसीय सलामीच्या सामन्यात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पीवायसीचा पहिला डाव 82.2 षटकात सर्वबाद 278धावावर संपुष्टात आला. सलामीचे फलंदाज साईराज चोरगे(18धावा), सय्यद सुफयान(17 धावा) हे झटपट बाद झाल्यामुळे पीवायसी संघ २७.१ षटकात ५बाद ८३ धावा असा अडचणीत सापडला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या निखिल लुणावतने 164 चेंडूत 14चौकार व 1 षटकारासह 111 धावांची शतकी खेळी करून संघाचा डाव सावरला. त्याला वरुण चौधरीने 72चेंडूत 7चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 47 धावा काढून साथ दिली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 124 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. त्यानंतर निखिल याने आदित्य विसपुते(नाबाद 23धावा)च्या साथीत सातव्या गड्यासाठी 138 चेंडूत 70 धावाची भागीदारी केली. 22 यार्डस संघाकडून प्रथम टी(4-35), साहिल नलगे(2-55), कूश पाटील(1-25), श्रीनिवास लेहेकर(1-62) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
याच्या उत्तरात 22 यार्डस संघाने आज दिवस अखेर 3 षटकात बिनबाद 20धावा केल्या. यात ऋषिकेश दौंड नाबाद 15, साहिल नलगे नाबाद 5 धावांवर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड, रिजुता भालेकर, पीवायसी हिंदु जिमखानाचे सचिव सारंग लागु आणि क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिषेक ताम्हाणे, शिरीष साठे आणि मकरंद फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या स्पर्धेला गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड यांनी सलग पाच वर्षे प्रायोजकत्व प्रदान केल्यामुळे त्यांचे पीवायसी हिंदू जिमखानाच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.
सामन्याचा निकाल: पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना : 82.2 षटकात सर्वबाद 278धावा(निखिल लुणावत 111(164,14×4,1×6), वरुण चौधरी 47(72,7×4,1×6), आदित्य विसपुते नाबाद 23, सोहम कांबळे 18, साईराज चोरगे 18 , सय्यद सुफयान 17, सुशांत अभंग 14, प्रथम टी 4-35, साहिल नलगे 2-55, कूश पाटील 1-25, श्रीनिवास लेहेकर 1-62) वि. 22 यार्डस:3 षटकात बिनबाद 20धावा(ऋषिकेश दौंड नाबाद 15, साहिल नलगे नाबाद 5);
महत्वाच्या बातम्या –
गुरबाज बनला विक्रमवीर! वर्ल्डकपममध्ये इंग्लंडविरुद्ध केला ‘असा’ Record, लंकेच्या दिग्गजाचा विक्रम तुटला
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भूषण, एजस आणि नरेंदर यांना दुहेरी मुकुट