पुणे, 29 ऑक्टोबर 2023- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत श्रेयश वाळेकर(नाबाद 122धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने रिक्रिएशन क्रिकेट क्लबचा 5 गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला. तर, आर्यन्स क्रिकेट क्लब संघाने दुसरा विजय नोंदवला.
पीवायसी हिंदु जिमखाना मैदानावरील लढतीत प्रथम फलंदाजी करताना रिक्रिएशन क्रिकेट क्लब संघाचा डाव 37.1 षटकात सर्वबाद 238 धावावर संपुष्टात आला. यात रुद्रज घोसाळे 69, सर्वेश भट्टड 33, सौरभ संकलेचा 31, श्रेयस जिवणे 23, अमित निंबाळकर 20 यांनी धावा केल्या. पीवायसीकडून यश माने(3-25), रोहित जाना(3-56), नचिकेत वेर्लेकर(1-33) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
हे आव्हान पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 38 षटकात 5बाद 239धावा करून पुर्ण केले. यात श्रेयश वाळेकरने आक्रमक फलंदाजी करताना 112चेंडूत 14चौकार व 2षटकाराच्या मदतीने नाबाद 122 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. श्रेयश याने दिव्यांग हिंगणेकर 32धावा) च्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 61चेंडूत 60धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्रेयश व रोहन दामले(37 धावा)यांनी चौथ्या गड्यासाठी 47चेंडूत 64धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. रोहन बाद झाल्यावर श्रेयशला यश माने 28धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 66चेंडूत 68धावा काढून संघाचा विजय सुकर केला.
आर्यन्स क्रिकेट मैदानावरील लढतीत अजित गव्हाणे(73धावा)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट क्लब संघाने 22 यार्ड्स संघाचा 3 गडी राखून पराभव केला. (PYC Hindu Gymkhana team’s third consecutive victory in the Doshi Engineers Karandak Interclub Cricket Tournament)
निकाल: आर्यन्स क्रिकेट मैदान:
22 यार्ड्स: 50षटकात 8बाद 291धावा(ऋषिकेश दौंड 56(61,8×4,1×6), श्रेयस केळकर 44(45,4×4,3×6), गौरव कुमकर 44(74,1×4), साहिल नलगे 41(39,4×4,2×6), योगराज देशमुख 25, निशांत मस्के 25, शुभम कटारे 19, हरी सावंत 3-66, सौरभ दोडके 2-53, तनय संघवी 2-76) पराभुत वि.आर्यन्स क्रिकेट क्लब:43.5षटकात 7बाद 295(अजित गव्हाणे 73(85,8×4), शुभम तैस्वाल 54(52,5×4,1×6), अभिषेक ताटे 33(33), तनय संघवी नाबाद 29, रितेश तिडके 27, यशराज खाडे 24, सागर सिंग 3-46, गौरव कुमकर 3-40); सामनावीर – अजित गव्हाणे; आर्यन्स संघ 3 गडी राखून विजयी;
पीवायसी मैदान:
रिक्रिएशन क्रिकेट क्लबः 37.1 षटकात सर्वबाद 238 धावा(रुद्रज घोसाळे 69(37,7×4,5×6), सर्वेश भट्टड 33(31,2×4,3×6), सौरभ संकलेचा 31(31), श्रेयस जिवणे 23, अमित निंबाळकर 20, यश माने 3-25, रोहित जाना 3-56, नचिकेत वेर्लेकर 1-33)पराभुत वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 38 षटकात 5बाद 239धावा(श्रेयश वाळेकर नाबाद 122(112,14×4,2×6), रोहन दामले 37(20,2×4,3×6), दिव्यांग हिंगणेकर 32(33,7×4), यश माने 28, गुरवीर सिंग सैनी नाबाद 10, सौरभ संकलेचा 2-36, संतोष दाभाडे 1-31); सामनावीर – श्रेयश वाळेकर; पीवायसी संघ 5गडी राखून विजयी.
महत्वाच्या बातम्या –
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया
नाद करा पण हिटमॅनचा कुठं! फक्त 48 धावा करताच रोहितच्या नावे जबरदस्त विक्रमाची नोंद, वाचाच