आशिया चषक 2022 मध्ये भारतने 8 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला. विरट कोहली याने जवळपास तीन वर्षांनंतर या सामन्यून आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ संपवला. विराटचे शतक संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी आनंदाची बाब होती, परंतु अशातच एक वाईट बातमी देखील समोर आली. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी संपूर्ण क्रिकटजगतासाठी निराश करणारी होती. भारतीय संघासोबत एलिझाबेथ द्वितीय यांचे संबंध खास होते. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराणी एलिझाबेथ यांच्या जाण्याची बातमी सलजल्यानंतर सबंद ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. सर्व नागरिक त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. त्यांच्या निधनाची वार्त समजल्यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेलला जाणारा कसोटी सामना एक दिवसाने पुढे ढकलला गेला. महाराणी आणि भारतीय क्रिकेट संघाचे जुने नाते आहे. भारताने त्याचा सर्वात पहिला विजय एलिझाबेद महाराणी बनल्यानंतर मिळवला होता.
भारता स्वतंत्र होण्याच्या आधीच भारतीय क्रिकेट संघ बनला होता. सर्वप्रथम 1952 मध्ये भारताने त्याचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. असे असले तरी, संघाला पहिला विजय मात्र सहजासहजी मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा पहिल्या विजय आणि महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा खास संबध आहे. ब्रिटनचे महाराजा जॉर्ज पष्ठम यांचे 6 फेब्रुवारी 1952 साली निधन झाले होते आणि त्यानंतर एलिझाबेथ यांनी त्यांची गादी सांभाळली. एलिझाबेथ महाराणी बनल्यानंतर भारताने पहिला कसोटी विजय मिळवला. 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान हा कसोटी सामना खेळला गेला होता. मुद्रास म्हणजेच सध्याच्या चेन्नई शहरात पार पडलेल्या या सामन्यात भारताने एक डाव आणि 8 धावांनी विजय मिळवला होता.
6 फेब्रुवारी रोजी महाराजांच्या निधनानंतर उभय संघातील हा कसोटी सामना एक दिलस थांबला गेला होता. 7 फेब्रुवारीला विश्रांती घेतल्यानंतर 8 फेब्रुवारीपासून सामना पुन्हा सुरू झाला. पहिल्या डावात इंग्लंडने 266 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 9 विकेट्स आणि 457 धावांचा डोंगर उभा करून डाव घोषित केला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 183 धावांवर गुंडाळला गेला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शतकानंतर विराटचा फॅन बनला अख्तर, म्हटले ‘मॅन ऑफ स्टिल’; अनुष्कालाही दिले ‘हे’ नाव
‘दुखापतीनंतर पुनरागमन सोपे नव्हते’, कर्णधार राहुलने सांगितली ‘कमबॅक’ची कहाणी
‘त्याच्या जागी रहाणे किंवा रोहित असता तर?…’ माजी दिग्गजाने थेट भारताच्या निवडसमितीवरच उचलले सवाल