दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला राहिला होता. तर दुसऱ्या दिवसाचा (२७ डिसेंबर) खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. यादरम्यान भारतीय खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे वेळ घालवताना दिसून आले. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर गप्पा मारताना दिसून येत आहेत. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी डान्स स्टेप्सपासून ते दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत आपले विचार मांडले आहेत.
शार्दुल ठाकूरने या व्हिडिओमध्ये म्हटले की, “मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खूप मजा करत आहे. हा माझा पहिला दक्षिण आफ्रिका कसोटी दौरा आहे. पण माझ्या मनात शेवटच्या दौऱ्याच्या अनेक आठवणी आहेत. मागच्या दौऱ्यावर, मला एक वनडे खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये मी चार गडी बाद केले होते. तसेच, सेंच्युरियनमध्येच मी माझे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.”
On an otherwise gloomy day in Centurion, here's something to brighten up your feed 👌🙂
Of dance moves, comebacks and more – here's a fun Walk & Talk, featuring @ashwinravi99 & @imShard. 👍 👍 – By @28anand
Full video 🔽 #TeamIndia #SAvINDhttps://t.co/3GKonIoqWb pic.twitter.com/LwR8ndGjLC
— BCCI (@BCCI) December 27, 2021
तसेच आपल्या डान्स स्टेपबद्दल बोलताना आर अश्विन म्हणाला की, “डान्स माझ्या अभ्यासक्रमाबाहेरचा विषय आहे. स्वतःकडे पाहून मला वाटतं की मी एका विशिष्ट पद्धतीने नाचू शकतो, पण मी ते अजिबात करू शकत नाही.” आपल्या ‘वाथी कमिंग’ डान्सबद्दल बोलताना आर अश्विन म्हणाला की, कदाचित अभिनेता विजयला माझ्याकडून प्रेरणा मिळाली असावी.
तसेच आपल्या साखरपुड्याबाबत बोलताना शार्दुल म्हणाला की, “मी खूप दिवसांपासून याची प्लॅनिंग करत होतो. पण गेल्या १५ महिन्यांत क्रिकेटचे खूप व्यस्त वेळापत्रक होते आणि खूप प्रवास करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून मला विश्रांती दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानेन. मला वाटले की लग्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. क्रिकेटसोबतच वैयक्तिक आयुष्यही खूप महत्त्वाचे आहे.”
आर अश्विनने मस्करी करत म्हटले की, “दक्षिण आफ्रिका दौरा हा खूप कठीण दौरा असतो.मागच्या दौऱ्यावर आम्ही चांगले खेळलो होतो. मात्र, मालिका २-१ ने गमावली होती. कारण ‘हुक-पुल’ करू शकणारा खेळाडू आमच्याकडे नव्हता. एक असा खेळाडू जो आखूड टप्प्याचे चेंडू मैदानाबाहेर मारू शकतो. तू ते ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये केले होते. आता योग्य वेळ आहे की, हीच कामगिरी तू दक्षिण आफ्रिकेत केली पाहिजे.”(R Ashwin and shardul thakur talks with each other on day 2)
याचे उत्तर देत, शार्दुल ठाकूर म्हणाला की, “मी त्याच गोष्टीची वाट पाहत आहे. मला आशा आहे की हे दक्षिण आफ्रिकेतही होईल. एक संघ म्हणून म्हणून आम्ही २ परदेशी दौऱ्यावर घवघवीत यश मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीमध्ये योगदान देण्यासाठी मी उत्साही आहे.”
महत्वाच्या बातम्या :
अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट
तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव
हे नक्की पाहा :