काहीदिवसांपूर्वीच इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेचा थरार रंगला. त्यातच लगेचच आयपीएल २०२२ स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. या हंगामात दोन नव्या संघांचा समावेश होत आहे. अशा खेळाडूंचा देखील मोठा लिलाव पार पडणार आहे. दरम्यान याबद्दल भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आपली स्पष्ट मतं मांडली आहे.
रविचंद्रन अश्विन गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला माहीत आहे की आगामी आयपीएल २०२२ च्या लिलावादरम्यान फ्रँचायझी त्याला संघात कायम ठेवणार नाही. अश्विनने स्पष्ट केले की तो आणि आणखी एक मोठा खेळाडू बाहेर पडण्याची खात्री आहे. अश्विन गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळत आहे. यापूर्वी तो पंजाब किंग्जशी जोडलेला होता. त्याने दोन वर्षे पंजाबसाठी कर्णधाराची भूमिकाही बजावली.
एका यूट्यूब चॅनेलवरील संभाषणात रविचंद्रन अश्विनने शंका व्यक्त केली की दिल्ली कॅपिटल्स त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरला देखील संघात कायम ठेवणार नाही. अश्विनला दिल्लीने कायम ठेवलेल्या क्रिकेटपटूंबाबत विचारण्यात आले. तो म्हणाला, “मला वाटतं श्रेयस त्यात नसेल. मीही त्यांच्यात नाही. जर मला कायम ठेवण्यात आले असते, तर मला त्याबद्दल माहिती असती.”
साल २०१५ मध्ये आयपीएल लिलावानंतर श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सशी जोडले गेलेला होता. आयपीएल २०१८ मध्ये गौतम गंभीरला स्पर्धेच्या मध्यात कर्णधारपदावरून हटवून अय्यरला ही जबाबदारी देण्यात आली होती. श्रेयस अय्यरला आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याच्या आधी दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिला टप्पा खेळू शकला नव्हता. त्यामुळे दिल्लीच्या नेतृत्त्वाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली. पंतच्या दमदार कामगिरीनंतर कर्णधार म्हणून त्याला अय्यरच्या पुनरागमनानंतरही कायम ठेवण्यात आले. तसेच पुढील हंगामातही दिल्लीचे कर्णधारपद पंतकडेच कायम राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएल २०२० मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. त्यांना अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभूत व्हावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
तुफानी फलंदाजी! वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारे ६ फलंदाज
न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत युवा शुबमन गिलला मिळणार नवी जबाबदारी?