चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) पहिला कसोटी सामना चालू आहे. भारतीय गोलंदाजांनी मिळून कसाबसा तिसऱ्या दिवशी पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आणला. यादरम्यान भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. पण यासाठी त्याने कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक षटके गोलंदाजी केली आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावादरम्यान अश्विनने तब्बल ५५.१ षटके म्हणजे ३३१ चेंडू टाकले आहेत. एवढ्या चेंडूत तब्बल १४६ धावा देत त्याने इंग्लंडच्या फक्त ३ फलंदाजांना बाद केले आहे.
तसे तर, कसोटी सामन्याच्या एका डावात ५० पेक्षा जास्त षटके टाकण्याची ही अश्विनची पहिली वेळ नाही. यापुर्वी त्याने २०१२ मध्ये ऍलडेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात तब्बल ५३ षटके गोलंदाजी केली होती. यावेळी १९४ धावा देत त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. याचवर्षी कोलकाता येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यातील एका डावात त्याने ५२.३ षटके टाकली होती.
तसेच २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील एका डावात त्याने ५० हून अधिक षटके गोलंदाजी केली होती.
एका कसोटी डावात अश्विनने टाकलेली सर्वाधिक षटके
५५.१ विरुद्ध इंग्लंड, चेन्नई २०२१ (३/१४६)
५३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऍडलेड २०१२ (३/१९४)
५२.५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऍडलेड २०१८ (३/९२)
५२.३ विरुद्ध इंग्लंड, कोलकाता २०१२ (३/१८३)
५२.१ विरुद्ध वेस्ट इंडिज, मुंबई २०११ (५/१५६)
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, इंग्लंडच्या ५७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात विशेष झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल पहिल्या १० षटकातच बाद झाले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेही स्वस्तात बाद झाले. टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा यष्टीरक्षक रिषभ पंतसोबत संघाचा पुढे नेत आहे. या दोन्ही फलंदाजांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. तिसऱ्या दिवशीच्या टी-ब्रेकपर्यंत भारत ४ बाद १५४ धावांवर आहे. इंग्लंडचे आव्हान पूर्ण करण्यासाठी भारताला अजून ४२४ धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG Test Live : पुजारा आणि पंतचे अर्धशतक पूर्ण; दुसऱ्या सत्राखेर भारताच्या ४ बाद १५४ धावा
जबरदस्त! जो रुटने डाईव्ह मारत अजिंक्य रहाणेचा घेतला एकहाती भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
भारतात नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा अश्विन दुसरा, पाहा पहिलं नाव कुणाचं