आर अश्विन याला क्रिकेटजगतातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये गणले जाते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन केले आहे. पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या सर्वाधिक ६ फलंदाजांना बाद केले. त्यातही इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्स याची विकेट त्याच्यासाठी अतिशय विशेष ठरली.
दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला स्टोक्स १२ चेंडूत फक्त ७ धावा करू शकला. अश्विनने त्याला डावातील १८.१ षटकात यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून झेलबाद केले. महत्त्वाचे म्हणजे, अश्विनने स्टोक्सला बाद करण्याची ही पहिली-दुसरी वेळ नव्हती. २०११ साली आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अश्विनने स्टोक्सला बाद करण्याची ही आठवी वेळ होती.
स्टोक्स व्यतिरिक्त डेविड वॉर्नर, ऍलिस्टर कूक यांना अश्विनने सर्वाधिकवेळा कसोटीत बाद केले आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नर आतापर्यंत सर्वाधिक १० वेळा अश्विनची शिकार बनला आहे. तर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू कूक यांना त्याने ९ वेळा बाद केले आहे.
अश्विनने कसोटीत सर्वाधिक वेळा बाद केले फलंदाज
१० वेळा- डेविड वॉर्नर
९ वेळा- ऍलिस्टर कूक
८ वेळा- बेन स्टोक्स
७ वेळा- एडवर्ड काउन
खास बाब अशी की, स्टोक्स हा डावखुरा फलंदाज आहे आणि अश्विन हा डावखुऱ्या फलंदाजांसाठी धोक्याची घंटा असल्याप्रमाणे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विश्वविक्रम अश्विनच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शंभराव्या कसोटीत इंग्लंडच्या संघनायकाचा दे घुमा के! चोपल्या २५० हून अधिक धावा
लॉरेन्सला बाद करत इशांतने पूर्ण केल्या ३०० कसोटी विकेट्स, पण ‘या’ बाबतीत पडला मागे





