---Advertisement---

आर अश्विनने त्याच्या विक्रमी शतकाचं श्रेय दिलं टीम इंडियातील ‘या’ व्यक्तीला

On: सोमवार, फेब्रुवारी 15, 2021 11:14 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आर अश्विनने शतकी खेळी केली. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील ५ वे शतक आहे. त्याच्या शतकाने भारतीय संघाला या सामन्यात विजयाच्या जवळ आणले आहे.

अश्विनने दुसऱ्या डावात १४८ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १०६ धावा केल्या. त्याच्या या शानदार फलंदाजीचे श्रेय अश्विनने भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना दिले आहे.

विक्रम राठोड यांना श्रेय

दुसरा सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर आर अश्विन याने मुलाखतीत म्हटले की, ” मी हे नाही बोलणार की हे गेल्या ३ दिवसात झाले आहे. मी विक्रम राठोड यांच्यासोबत गेल्या काही महिन्यापासून सराव करत आहे, माझ्या फलंदाजीचे श्रेय मी त्यांनाच देऊ इच्छितो.”

चेन्नई हे आर अश्विन याचे घरचे मैदान आहे. यामुळे इकडे खेळण्याचा अनुभव हा त्याच्यासाठी काही वेगळाच असतो. यावर आर अश्विन म्हणाला, “माहीत नाही पुढील कसोटी सामना केव्हा होईल, परंतु मी खुश आहे. माहिती नाही चेन्नईमध्ये पुन्हा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळेल की नाही आणि मिळाली तर कधी मिळेल. संघ काय अनुभवत आहे माहिती नाही परंतु सर्व रोमांचकारी आहे. मी सर्वच प्रेक्षकांचे आभार मानतो, ज्यांनी मला पाठिंबा दिला.”

अश्विनची रिचर्ड हॅडली यांच्याशी बरोबरी

अश्विनने कसोटीमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी सहाव्यांदा केली आहे. त्यामुळे त्याने सर्वाधिकवेळा एकाच कसोटी सामन्यात अर्धशतक आणि एका डावात ५ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रिचर्ड हॅडली यांची बरोबरी केली आहे. हॅडली यांनीही ६ वेळा अशी कामगिरी केली आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर इयान बॉथम असून त्यांनी ११ वेळा ही कामगिरी केली आहे. तर बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१ पूर्वी पंजाबच्या संघाने घेतला मोठा निर्णय, करणार ‘हा’ महत्वपूर्ण बदल

भारत-इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटीमुळे ‘या’ दोन माजी दिग्गजांमध्येच जुंपले ट्विटर वॉर

‘या’ कृतीमुळे पस्तावणार विराट कोहली? होऊ शकते बंदीची कारवाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---