बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात गोलंदाजीची सुरवात चांगली केली आहे.
या सामन्यात भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने त्याच्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अफगाणिस्तानचा कर्णधार असघर स्टॅनिकझाईला त्रिफळाचित बाद केले.
अश्विनची ही कसोटी क्रिकेटमधील 312 वी विकेट होती त्यामुळे त्याने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या 311 कसोटी विकेटच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
अश्विनने ही कामगिरी त्याच्या 58 कसोटी सामन्यात केली आहे. त्याने या 58 कसोटी सामन्यात 25.48 च्या सरासरीने 312 विकेट घेतल्या आहेत. यामुळे आता तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज झाला आहे.
या यादित अव्वल क्रमांकावर अनिल कुंबळे असुन त्याने 619 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज:
619 विकेट – अनिल कुंबळे
434 विकेट – कपिल देव
417 विकेट – हरभजन सिंग
312 विकेट – आर अश्विन*
311 विकेट – झहिर खान@Maha_Sports #म #मराठी @MarathiBrain @MarathiRT #INDvAFG— Pranali Kodre (@Pranali_k18) June 15, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–टी-20 चा सुपरहीरो कसोटीमध्ये ठरला झीरो!
–एकमेव कसोटी सामन्यात कमी धावसंख्येवर अफगानिस्तानने भारताला रोखले
–मोहम्मद कैफचा सौम्या स्वामिनाथनला पाठींबा