भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जवळपास 11 महिन्यानंतर मैदानावर परतला आहे. बुमराहकडे या दौऱ्यावरील भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे, बुमराहकडे कर्णधारपद, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा विस्फोटक फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतुराजने मागील काही काळापासून आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. अशात त्याच्याविषयी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने ऋतुराज गायकवाडचे कौतुक केले आहे. चला तर, अश्विन ऋतुराजबद्दल काय बोलला आहे, जाणून घेऊयात…
काय म्हणाला अश्विन?
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “ऋतुराज हा जागतिक दर्जाचा आहे. तो प्रभू देवाच्या डान्स मूव्हजसारखा उत्कृष्ट आहे.”
Ashwin said "Ruturaj is world class, he is so elegant like Prabhu Deva's dance moves, he is born to make batting looks easy – if someone ask me to pay to watch him bat even at the nets all day, I will definitely pay to watch him bat". [Ashwin YT] pic.twitter.com/vrB43XoW2s
— Johns. (@CricCrazyJohns) August 19, 2023
पुढे त्याने ऋतुराजच्या फलंदाजीचे कौतुक करत म्हटले की, “त्याचा जन्म फलंदाजी सोप्या पद्धतीने दिसण्यासाठीच झाला आहे. जर मला कुणी त्याला नेट्समध्ये फलंदाजी करताना पाहण्यासाठी पैसे देण्यास सांगितले, तर मी नक्कीच त्याला फलंदाजी करताना पाहण्यासाठी पैसे देईल.”
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ऋतुराजकडे कर्णधारपद
चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. यामधील क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान खेळली जाणार आहेत. ही क्रिकेट स्पर्धा टी20 प्रकारात खेळली जाणार असून भारतीय संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर असणार आहे. ऋतुराज स्पर्धेचे विजेतेपद जिंकून आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
ऋतुराजची कारकीर्द
ऋतुराज गायकवाड याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 2 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 27 धावा, तर टी20त एक अर्धशतकाच्या मदतीने 154 धावा केल्या आहेत. (R Ashwin Praised Ruturaj Gaikwad says he is world class read here)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर ब्रूकची रिऍक्शन! म्हणाला, ‘स्टोक्स संघात आल्यामुळे मला…’
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव