---Advertisement---

क्या बात है! फलंदाजीत १५ षटकार, गोलंदाजीत लॅब्यूशेनची विकेट; ‘त्या’ ४५ वर्षीय क्रिकेटरचे आर अश्विनकडूनही कौतुक

On: शनिवार, मे 22, 2021 4:02 PM
---Advertisement---

जिद्द आणि आवड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, याचा प्रत्येय अनेक क्रिकेटरसिकांना शुक्रवारी आला. झाले असे की एका ४५ वर्षाच्या खेळाडूने फलंदाजी करताना तब्बल १५ चौकार आणि १५ षटकारांची बरसात करत सर्वांचे लक्ष वेधले. एवढेच नाही तर गोलंदाजी करताना मार्नस लॅब्यूशेन या महत्त्वाच्या फलंदाजाची विकेटही घेतली. या ४५ वर्षीय खेळाडूचे नाव आहे डॅरेन स्टीवन्स. या क्रिकेटपटूने भारताचा फिरकीपटू आर अश्विननेही कौतुक केले आहे.

केंटकडून खेळताना केली जबरदस्त कामगिरी
सध्या इंग्लंडमध्ये कौऊंटी चॅम्पियनशीपचा हंगाम सुरु आहे. या स्पर्धेत केंट विरुद्ध ग्लॅमॉर्गन संघात २० मे पासून सामना सुरु झाला आहे. या सामन्यात केंट संघाने प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांची वरची आणि मधली फळी कोलमडली असताना ७ व्या क्रमांकावर डॅरेन फलंदाजीसाठी उतरला. त्याने यावेळी ताबडतोड फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने १५ चौकार व १५ षटकारांच्या मदतीने १४९ चेंडूत १९० धावांची शानदार खेळी केली.

डॅरेनने या खेळीदरम्याने केवळ ९२ चेंडूमध्ये ७ षटकारांच्या मदतीने आपले ३६ वे शतक पूर्ण केले होते. शतकानंतर त्याने धावांचा वेग वाढवला. तो द्विशतकाकडे वाटचाल करत असताना मार्नस लॅब्युशेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने नवव्या गड्यासाठी वेगवान गोलंदाज मिग्युएल कमिन्ससह १६६ धावांची भागीदारी केली. कमिन्सने ६१ चेंडूंमध्ये सात धावा केल्या. सध्या डॅरेन काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या खेळणाऱ्या वयस्कर खेळाडूंमध्ये सामील आहे.

एवढेच नाही तर केंट संघाला पहिल्या डावात ३०७ धावा अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिल्यानंतर गोलंदाजी करतानाही डॅरेनने कमाल केली. त्याने ६ व्या षटकात लॅब्यूशेनला केवळ १४ चेंडूत ११ धावांवर पायचीत करत माघारी धाडले.

अश्विनने केले कौतुक
डॅरेनच्या या खेळीचे अनेकांनी कौतुक केले आहे, यात भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडे, अश्विनही आहे. शिखाने ट्विट केले होते की ‘डॅरेन स्टीवन्स एक शानदार खेळाडू आहे.’ त्यावर प्रतिक्रिया देताना अश्विननेही डॅरेनचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘हो, तो आहे.’

अश्विन हा ट्विटरवर सातत्याने सक्रिय असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो नेहमीच खेळाडूंबद्दल, क्रिकेटबद्दल किंवा अन्य विषयांवरही त्याची मते स्पष्टपणे मांडताना दिसून येतो.

महत्त्वाच्या बातम्या –

एवढा कॉन्फिडन्स! इंग्लिश दिग्गजाची भविष्यवाणी, भारत-इंग्लंडमध्ये ‘हा’ संघ ५-०ने जिंकेल कसोटी मालिका

‘विराटसेना’साठी इंग्लंडकडून खुशखबर! क्वारंटाईन कालावधीत घट, सरावासही मिळणार जास्तीचा वेळ

विराटचा हुकमी एक्का म्हणतोय, “मी आज जे काही आहे त्यामध्ये माही भाईचा मोठा हात आहे”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---