भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी काही दिवसांपूर्वी आर अश्विनला सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणले जाऊ शकत नाही, असे व्यक्तव्य केले होते. मात्र, आता आर अश्विननेच एक गमतीशीर ट्विट करत त्यांच्या व्यक्तव्याला प्रतिउत्तर दिले आहे.
मांजरेकरांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की ‘सर्वकालीन सर्वोत्तम ही क्रिकेटपटूला दिली जाणारी मोठी पोचपावती आणि कौतुक आहे. डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर, विराट इत्यांदीसारखे क्रिकेटपटू माझ्यासाठी सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत येतात. पूर्ण आदरपूर्वक सांगतो की अश्विन अजून सर्वकालीन सर्वोत्तमच्या यादीत आलेला नाही.’
‘All- time great’ is the highest praise & acknowledgement given to a cricketer. Cricketers like Don Bradman, Sobers, Gavaskar, Tendulkar, Virat etc are all time greats in my book. With due respect, Ashwin not quite there as an all-time great yet. 🙏#AllTimeGreatExplained😉
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) June 6, 2021
माजरेकरांच्या या ट्विटला सोमवारी (७ जून) आर अश्विनने मजेशीर उत्तर दिले. त्याने ‘अपरिचीत’ या प्रसिद्ध चित्रपटातील एक डायलॉग लिहिलेले मीम शेअर केले. तसेच हसण्याच्या इमोजीही ट्विटमध्ये टाकल्या आहेत.
अश्विनने शेअर केलेल्या मीमवर तमिळ भाषेत लिहिले होते की ‘अपडी सोलधा दा चारी, मानसेल्लम वल्लीकिरधू’. ज्याचा अर्थ होते की ‘अशा गोष्टी बोलू नका, वाईट वाटते.’
😂😂😂🤩🤩 https://t.co/PFJavMfdIE pic.twitter.com/RbWnO9wYti
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) June 7, 2021
नक्की काय झाले होते?
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपल यांनी अश्विनला वर्तमान काळातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे म्हटले होते. परंतु या गोष्टीवर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे असहमत दिसून आले होते. यासोबतच त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते.
संजय मांजरेकर यांनी इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटले होते की, “सर्व लोक अश्विनला वर्तमान काळातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे असे म्हणतात. परंतु मी या गोष्टीशी असहमत आहे. कारण अश्विनने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांमध्ये एकदाही ५ गडी बाद करण्याचा किर्तिमान केला नाहीये. जर तुम्ही भारतातील खेळपट्टीवर दमदार कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलत असाल तर गेल्या ४ वर्षांत रवींद्र जडेजानेही अश्विन इतकेच गडी बाद केले आहेत.”
या आपल्या वक्तव्यानंतर मांजरेकरांनी ट्विट देखील केले होते. त्यामुळे त्यावर बरीच चर्चा झाली होती.
अश्विनची कारकिर्द
आर अश्विनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७८ कसोटी सामने खेळले असून ४०९ विकेट्स घेतल्या आहेत. तो भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने ३० वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर ७ वेळा सामन्यांत १० विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
याशिवाय अश्विनने १११ वनडेत १५० विकेट्स घेतल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४६ सामन्यांत ५२ विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
नासिर हुसेननंतर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने देखील इंग्लिश खेळाडूंवर केली बोचरी टीका; म्हणाला…
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी केन विलियम्सनने भारतीय संघाबद्दल ‘असे’ व्यक्तव्य करुन जिंकली मने
व्हिंटेज धोनी! सीएसकेने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस