मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्याच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना इंदोर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. यादरम्यान पाहुण्या संघाचे खेळाडू दमदार फटकेबाजी करत असताना भारताचा वेगवान दीपक चहरने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला धावबाद (मंकडिंग) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर आता भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ट्रोल होताना दिसत आहे.
दक्षिण आफ्रिका संघाच्या डावात भारताकडून 16 वे षटक टाकण्यासाठी दीपक चहर आला होता. चहर त्याच्या षटकातील पहिला चेंडू टाकत होता, तेव्हा नॉन स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेला स्टब्स पुढे जाताना दिसला. त्यावेळी चहरने चपळतेने त्याला मंकडिंग (Deepak Chahar Mankading) द्वारे धावबाद करण्याचा प्रयत्न केला. चहर चेंडू फेकण्यापूर्वीच स्टब्स क्रीझ सोडून पुढे गेला होता. त्यामुळे चहर मध्येच थांबला आणि धावबाद करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, त्यानंतर केवळ ताकीद देत त्याने त्याला आणखी एक संधी दिली.
Sources say Ashwin is upset with Chahar pic.twitter.com/BmrQLOWem1
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) October 4, 2022
https://twitter.com/Harsh6075/status/1577312772240867331?t=M22Qvu6-hEui0BXCzGjtOg&s=19
या संपूर्ण घटनेनंतर भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन चर्चेत आला आहे. अश्विनने 2019 आयपीएल वेळी पंजाबसाठी खेळताना राजस्थानच्या जोस बटलर याला अशा पद्धतीने बाद केले होते. एका ट्विटर हँडलवरून लिहीले गेले की, अशा बातम्या येत आहेत की रविचंद्रन अश्विन दीपक चहरवर नाराज आहे. अन्य एका नेहमी तयार करत लिहिले, ‘तुम्हारी टेक्निकही गलत है’
Ashwin Anna be like ; pic.twitter.com/CxyVm4YStg
— DIPTI MSDIAN (@Diptiranjan_7) October 4, 2022
आणखी एकाने अशाच प्रकारे एका चित्रपटातील दृश्य घेत मीम बनवले आहे. दीपक चहर या सामन्यात भारतातच सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने एक बळी मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी