भारत आणि इंग्लंड संघांमध्ये ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या अगोदर दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेला वेगवान गोलंदाज डेल स्टेनने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली नाही. डेल स्टेनने या कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी हुकमी एक्का कोणता गोलंदाज ठरेल याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
या कसोटी मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेची देखील सुरुवात होणार आहे. इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना जरी मदत मिळत असली तरी या मालिकेत आर अश्विन भारतासाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरणार असल्याचे स्टेनने म्हटले आहे.
डेल स्टेन म्हणाला की, इंग्लंडची खेळपट्टी बघून वेगवान गोलंदाजांना जास्त महत्त्व द्याल, पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ फिरकीपटूंच्या विरोधात जास्त कमकुवत आहेत. म्हणूनच स्टेनने अश्विनला भारतीय संघाचा हुकुमी एक्का म्हटले आहे.
डेल स्टेनने ईएसपीएन क्रिकइन्फोवर लिहिले की, ‘कदाचित माझी विचारसरणी थोडी वेगळी आहे, पण मला वाटते की, वेगवान गोलंदाजांकडे आपण अधिक लक्ष देत आहोत. पण, आर अश्विन हा भारतीय संघासाठी यशाचा मोठा मार्ग असू शकतो. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत फिरकी गोलंदाजांना मोठा फरक पाडतील.’
आर अश्विनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली नाही. परंतु, त्यानंतर काउंटी सामन्यादरम्यान तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये दिसून आला.या सामन्यात सरेकडून खेळताना अश्विनने सोमरसेटविरुद्ध २७ धावा देऊन ६ बळी घेतले. अश्विनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सोमरसेटचा दुसरा डाव अवघ्या 69 धावांवर गुंडाळला गेला. अश्विनने पहिल्या डावात विकेट घेतली होती. अश्विनच्या नावावर ४१३ कसोटी विकेट आहेत आणि कसोटी क्रमवारीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
डेल स्टेनने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे देखील कौतुक केले आहे. स्टेन म्हणाला की, सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, ते पाहून असे वाटते की तो एक लांबच्या शर्यतीचा घोडा आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्टेन आणि सिराज या दोन्ही खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले आहेत.
स्टेन म्हणाला की, सिराजच्या गोलंदाजीमध्ये आता एक वेगळीच आक्रमकता दिसत आहे. तो फलंदाजांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना चेंडू खेळण्यास भाग पाडत असतो. वेगवान गोलंदाजांमध्ये असणारा जोश त्याच्यामध्ये दिसून येतो. डेल स्टेनने भारतीय वेगवान गोलंदाजांना तंदुरुस्ती कायम ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. तो म्हणाला की, ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत खूप गोलंदाजी करावी लागणार आहे, त्यासाठी तंदुरुस्त राहणे महत्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा माणूस! देशासाठी ‘अशी’ मोठी मदत करत जिंकली मनं