एखादा खेळाडू क्रिकेट मैदानापासून दूर असला तरीही त्याला सराव चालू ठेवावाच लागतो. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन (ravichandran ashwin) खुप काळापासून संघाचा भाग आहे. मर्यादित षटकांच्या फिरकी गोलंदाजीची कमान त्याच्याच हातात आहे. काही काळापुर्वीच त्याने एकदिवसीय आणि टी२० संघात पुनरागमन केले आहे. परंतु त्याला ६ फेब्रुवारीला होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या (west indies) टी२० आणि एकदिवसीय संघात खेळण्यासाठी संधी मिळाली नाही. अशात त्याने नुकताच सोशल मिडीयावर त्याचा क्रिकेटचा सराव करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आर अश्विनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक रील शेअर केले आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करत असल्याचे दिसत आहे. तो व्हिडीओमध्ये अनेक शाॅट, एका हाताने फलंदाजी करताना दिसत आहे. तो व्हिडीओमध्ये पुर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. त्याच्या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक लाइक्स आल्या आहेत. त्याचा तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CZZXMmVoRKL/?utm_source=ig_web_copy_link
२०२१ च्या विश्वचषकात अश्विनला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर कित्येक चाहते त्याच्या संघातील निवडीवर खुश होते. पण कित्येकजण नाराज सुद्धा होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी सुद्धा त्याची निवड करण्यात आली होती. अश्विनचे ५० षटकांच्या प्रकारात खुप काळानंतर पुनरागमन झाले होते, परंतु दोन्ही मालिकांमध्ये तो काही खास कामगीरी करु शकला नाही, ज्यावर मोठ-मोठ्या दिग्गज खेळाडूंनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर आता त्याला वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात आलेले नाही. मात्र २५ फेब्रुवारीपासुन सुरु होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू संजय मांजरेकर खुपवेळा अश्विनच्या विरोधात बोतल असतो. यावेळी सुद्धा त्याने अश्विनबाबत त्याचे मत मांडले आहे. तो म्हणाला की, “पांढऱ्या चेंडूच्या प्रकारामध्ये अश्विनच्या पुनरागमनाचा काही फायदा नाही. तो पहिल्यासारखा प्रभावशाली गोलंदाज राहिलेला नाही”. या दिग्गजाने चहलच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले असून कुलदीप यादवच्या भारतीय संघातील पुनरागमनावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय संघ वेस्ट इंडीजसोबत ६ फेब्रुवारीपासुन ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. ही मालिका अहमदाबाद आणि कोलकत्ता या शहरांमध्ये पार पडणार असून वेस्ट इंडीज संघ भारतात दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलने पालटले सिराजचे आयुष्य, पहिल्या कमाईतून कुटुंबासाठी घेतलेली सेकंड हॅंड कार; तर स्वतःसाठी…
टी२० सामन्यात चहलने दिल्या तब्बल ६४ धावा, तरीही कॅप्टन धोनीने दिली ‘कूल’ प्रतिक्रिया; वाचा किस्सा
चालू वर्षी पुन्हा रंगणार ‘भारत-पाक क्रिकेटसंग्राम’; केव्हा? कोठे? घ्या जाणून