---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध सराव सामना जिंकल्यानंतरही ‘या’ दोन गोलंदाजांनी वाढवली टीम इंडियाची चिंता

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 12:00 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत त्याच्या अभियानाची सुरुवात २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. पण यापूर्वी सोमवारी (१८ ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंडमध्ये सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी भारतासाठी दोन गोलंदाजांची कामगिरी खराब झाली.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलांदाजी केली आणि ५ विकेटच्या नुकसानावर १८८ धावा केल्या आहेत. भारताचे भुवनेश्वर कुमार आणि राहुल चाहर हे दोन गोलंदाज संघाला महागात पडले आहेत. या दोघांनी १० पेक्षा अधिक इकोनोमीने धावा दिल्या आहेत. तसेच हार्दिक पंड्याने या सामन्यातही गोलंदाजी केली नाही.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने भुवनेश्वर आणि शार्दुल ठाकुरच्या खेळण्याबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “नेहमी फॉर्मला महत्त्व दिले पाहिजे. आयपीएलमध्ये शार्दुल चांगली गोलंदाजी करून येत आहे. अशात त्याला संधी मिळाली पाहिजे.” शार्दुल ठाकुरने आयपीएल २०२१ मध्ये सीएसकेसाठी १६ सामने खेळले आणि यामध्ये २५ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहे. तर दुसरीकडे भुवनेश्वरने केवळ ६ विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज राहुल चाहरने यावर्षी आयपीएलमध्ये ११ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. यूएईमधील आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र राहुल काही कमाल करू शकला नाही. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला मुंबई संघाने शेवटच्या काही सामन्यांमध्ये संघातून बाहेर ठेवले होते.

दरम्यान, सामन्यात गोलंदाजीवेळी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने चार षटकांमध्ये ५४ धावा दिल्या. तसेच राहुल चाहरने त्याच्या चार षटकांमध्ये ४३ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. भारतासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच बुमराहने षटकांमध्ये केवळ २६ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.

भारतीय संघाने १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग १९ षटकांत ३ विकेट्स गमावत १९२ धावा करत पूर्ण केला. भारताकडून सलामीला आलेल्या केएल राहुल आणि इशान किशन या दोघांनी अर्धशतके केली. केएल राहुल ५१ धावा करुन बाद झाला. तर इशान किशन ७० धावा करुन रिटायर्ड हर्ट झाला. तसेच विराट कोहली ११ आणि सूर्यकुमार ८ धावांवर बाद झाले. तर अखेर, रिषभ पंतने नाबाद २९ आणि हार्दिक पंड्याने १२ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या – 

“काहीतरी चमत्कारच मुंबई इंडियन्सला…”; पुढील हंगामाबाबत रोहितचे मोठे वक्तव्य

टी२० विश्वचषकात टीम इंडियाबरोबर अखेरच्यावेळी काम करण्याबद्दल क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांची भावनिक पोस्ट, म्हणाले…

राहुल-ईशानच्या वादळात उडाली इंग्लंड; सराव सामन्यात भारताचा शानदार विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---