पुणे | आज प्रो कबड्डीच्या पुणे लेगमध्ये पाटना पायरेट्स आणि तेलुगु टायटन्स संघात पहिला सामना होत आहे तर दुसरा सामना पुणेरी पलटन विरुद्ध जयपुर पिंक पॅंथर संघात होत आहे.
६व्या हंगामात आतापर्यंत २२ सामने झाले आहेत. आज या सामन्यात काही खास विक्रम होणार आहेत. त्यात पुणेरी पलटनचा कर्णधार गिरीष इरनक, जयपुर पिंक पॅंथरचा कर्णधार अनुप कुमारला मोठे पराक्रम करण्याची संधी आहे.
आज होणाऱ्या काही विक्रमातील खास विक्रम-
- प्रो कबड्डीत २०० टॅकल मिळविण्यासाठी पुणेरी पलटनचा कर्णधार गिरीष इरनकला ६ गुणांची गरज. त्याने आज जर हे ६ गुण घेतले तर प्रो कबड्डीत २०० गुण घेणारा तो ६वा खेळाडू ठरेल. त्याने आजपर्यंत ७४ सामन्यात १९४ गुण घेतले आहे.
- प्रो कबड्डीत ५०० रेड पाॅईंट घेणारा ६वा खेळाडू ठरण्यासाठी अनुप कुमारला केवळ २ गुणांची गरज. त्याने आजपर्यंत ८० सामन्यात ४८० गुण घेतले आहे.
- प्रो कबड्डीत १०० टॅकल मिळविण्यासाठी जयपुरच्या बाजीराव होडगेला केवळ ५ गुणांची गरज. त्याने आज जर हे ५ गुण घेतले तर प्रो कबड्डीत १०० गुण घेणारा तो १९वा खेळाडू ठरेल. त्याने आजपर्यंत ५७ सामन्यात ९५ गुण घेतले आहे.
- तेलुगु टायटन्सच्या राहुल चौधरीला प्रो कबड्डीत ७०० गुण केवळ रेडिंगमधून कमावणारा पहिला खेळाडू होण्यासाठी १४ गुणांची गरज. त्याने आजपर्यंत ८२ सामन्यात ६८६ गुण केवळ रेडिंगमधून मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-सलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच
–झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून
-टाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू
–नागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम
–वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ
–कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?
–एकदा- दोनदा नाही तर चक्क ६व्यांदा करणार विराट हा पराक्रम