Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहित आणि द्रविडचं भविष्य ‘या’ तारखेला ठरणार! बीसीसीआय टी-20 क्रिकेटसाठी घेऊ शकते मोठा निर्णय

रोहित आणि द्रविडचं भविष्य 'या' तारखेला ठरणार! बीसीसीआय टी-20 क्रिकेटसाठी घेऊ शकते मोठा निर्णय

December 19, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
rohit-sharma-rahul-dravid

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघ यावर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषका उपांत्या फेरीतून बाहेर पडला. इंग्लंडने भारताला 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभूत केले. या पराभवानंतर संघात मोठे बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. अखेर तो दिवस आता जवळ आला आहे. बीसीसीआयच्या एपेक्स काउंसिलच्या बैठकीत टी-20 फॉरमॅटमधील संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक बदलण्याविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यावरील जबाबदारी या बैठकीत कमी होऊ शकते. 

माहितीनुसार सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड () टी-20 संघातून विश्रांती मिळू शकते.  रोहित शर्माकडून टी-20 फॉरमॅटमधील संघाचे नेतृत्व काढून घेतले जाऊ शकते, तर राहुल द्रविडला देखील फक्त वनडे आणि कसोटी संघापुरतेच मर्यादित ठेवले जाण्याची शक्यता आहे. या दोघांच्या भविष्याविषयी एपेक्स काउंसिलच्या (BCCI Apex Council Meeting) बैठकीत निर्णय घेतला जाईल. ही बैठक 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या बैठकीनंतर फक्त रोहित आणि द्रिवड यांच्याविषयीच नाही, तर इतरही काही महत्वाचे बदल संघात पाहायला मिळू शकतात. तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक नियुक्त करण्याविषयी देखील बैठकीत चर्चा होणार आहे.

रोहित शर्मा सध्या 35 वर्षांचा आहे आणि त्याचे टी-20 फॉरमॅटमधील प्रदर्शन देखील मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित राहिले नाहीये.  अशात या फॉरमॅटमधून त्याला विश्रांती दिली जाण्याची पूर्ण शक्यता व्यक्त केली जात आहे. संघाला जानेवारी महिन्यात मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि वनेड मालिका खेळायची आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ नवीन प्रशिक्षक आणि कर्णधारासह मैदानात उतरेल, असे सांगितले जात आहे. रोहित आणि राहुलची या संघातून सुट्टी झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. टी-20 कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्या मागच्या मोठ्या काळापासून दावेदार राहिला आहे. पांड्याने गुजरात टायटन्सला त्यांच्या पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते.  (Rahul Dravid and Rohit Sharma’s future will be decided in this important meeting of BCCI)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे
लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी 


Next Post
david-warner-test

वॉर्नर होणार निवृत्त? सिडनी कसोटीनंतर घेऊ शकतो मोठा निर्णय

Ishant-Sharma-Ms-Dhoni

'हे काय सुरू केलंय?' टीम इंडियात सुरू झालेल्या नव्या परंपरेवर भडकला ईशांत

Lionel Messi with wife

प्रेम असावं तर असं! मेस्सीसाठी त्याच्या पत्नीने केला होता 'हा' त्याग, तुम्हालाही वाटेेल हेवा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143