रोहित शर्माच्या नेतृत्वाखील टीम इंडियाने यंदाचा टी20 विश्वचषक जिंकला. भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता. ट्राॅफी जिंकताच टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव झाला. बीसीसीआयने संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षिस घोषित केले होते. अश्या स्थितीत राहुल द्रविडला खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचा जंटलमॅन का म्हटले जाते, याचे आणखी एक ताजे उदाहरण त्यांनी मांडले आहे.
बीसीसीआयने झाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांच्या बक्षिसात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला 5 कोटी रुपये मिळाले. तर संघाच्या इतर प्रशिक्षकांना अडीच कोटी रुपये दिले जाणार होते. अशा परिस्थितीत राहुलने इतर प्रशिक्षकांप्रमाणेच अडीच कोटी रुपये घेण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच द्रविडने त्याच्या सपोर्ट स्टाफप्रमाणेच बोनस घेण्याचा निर्णय घेतला आहे.
In 2018 – Dravid refused to take 50 Lakh as prize money after the U-19 WC as other coaching staff were awarded 20 Lakh then later BCCI awarded 25 Lakh to all
In 2024 – Dravid refused to take 5 Crore as prize money as other coaching staff were getting 2.5 crore
RAHUL DRAVID 🫡 pic.twitter.com/DVqlrEpDMn
— Johns. (@CricCrazyJohns) July 10, 2024
वृत्त अहवालानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, राहुल द्रविडलाही इतर प्रशिक्षकांइतकाच बोनस घ्यायचा होता. बीसीसीआय त्यांच्या निर्णयाचा आदर करते. द्रविडला त्याच्या निस्वार्थ शैलीसाठी अनेक वेळा प्रशंसा मिळाली आहे. एक फलंदाज म्हणून त्याच्या सक्रिय खेळाच्या दिवसांतही त्याने संघाचे हित प्रथम ठेवले. द्रविडने प्रशिक्षक म्हणून आपल्या कामाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 2018 मध्ये भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडने अशीच भूमिका स्वीकारली होती. त्यावेळी द्रविडला 50 लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफच्या इतर सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये मिळणार होते. अशा परिस्थितीत द्रविडने अशी विभागणी नाकारली, बीसीसीआयला वाटणीची टक्केवारी बदलून सर्वांना समान बक्षीस देण्यास भाग पाडले. त्यानंतर बोर्डाने रोख पुरस्कारांची सुधारित यादी जारी केली, ज्यामध्ये द्रविडसह सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 25 लाख रुपये देण्यात आले.
महत्तवाच्या बाातम्या-
गौतम गंभीरच्या पहिल्या दौऱ्यावर वरिष्ठ खेळाडू बाहेर, वनडेतही रोहित-विराट नसतील! मोठे कारण उघड?
भारतीय संघाला मिळणार नवे बँटींग बाॅलिंग कोच, दोघांनी गाजवले आहेत मैदान
‘आयपीएलमधून होते 25 कोटी रुपयांची कमाई, तर …’ जाणून घ्या नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची एकूण संपत्ती