केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आगामी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असतील का? या प्रश्नाचे उत्तर भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहे. भारतीय प्रशिक्षक द्रविड यांनी सांगितले की, “आशिया चषकापूर्वी बंगळुरूमध्ये आठवडाभराचा शिबिर आहे. हे शिबिर 23 ऑगस्टपासून सुरू होत आहे. आशिया चषकापूर्वी दुखापतींशी लढणारे अनेक खेळाडू तंदुरुस्त झाल्यानंतर पुनरागमन करत आहेत. तसेच अशा खेळाडूंना आम्ही संधी देणार आहोत.” असेही द्रविड म्हणाले.
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी सांगितले की, केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आशिया चषकमध्ये भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसू शकतात. आयपीएल 2023 च्या हंगामात केएल राहुलला दुखापत झाली होती. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्याचवेळी या दुखापतीनंतर केएल राहुल लंडनमध्ये जखमी झाला. मात्र, आता भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की तो नेटवर सतत सराव करत आहे.
त्याचबरोबर श्रेयस अय्यरही दुखापतीतून जवळपास सावरल्याचे बोलले जात आहे. मात्र, तो कधी मैदानात परतणार हे सध्या स्पष्ट नाही. श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करू शकतो असे मानले जात आहे. आशिया चषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. राहुल आणि श्रेयश भारतीय संघात परतले तर संघ व्यवस्थापनाची अडचण कमी होऊ शकते. भारतीय संघातील फलंदाजीसाठी नंबर-4 आणि नंबर-5 क्रमांकाचा प्रश्न सुटू शकतो.
भारतीय संघाचा 4 आणि 5 या क्रमांकाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. भारताने या क्रमांकावर अनेक खेलाडूंना वापरून पाहिले. परंतु कोणताही फलंदाज या क्रमांकावर चांगली कामगिरी करू शकला नाही. यामुळे भारताला 4 आणि 5 क्रमांकाच गणित काही सुटलेले नाही. (rahul dravid provides injury player updates)
महत्वाच्या बातम्या-
INDvsWI: ‘आता कारणं देऊ नका’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने साधला निशाणा
BREAKING! इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज निवृत्ती! तडकाफडकी निर्णय घेण्यामागे आहे ‘हे’ कारण