भारतीय क्रिकेटपटू सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात व्यस्त आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या विश्रांती घेत आहे. दरम्यान द्रविड चक्क भाजपच्या (भारतीय जनता पक्ष) मंचावर दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ‘द वॉल’ द्रविड (Rahul Dravid) धरमशाला (Dharamshala) येथे होणाऱ्या भाजपच्या भाजयुमो (भारतीय जनता युवा मोर्चा) संमेलनाला हजेरी लावणार आहे. त्याच्याबरोबर कुस्तीपटू बबिता फोगाट (Babita Phogat) हीदेखील उपस्थित असणार आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासहित इतर अनेक राष्ट्रीय नेते धरमशाला येथे होणाऱ्या भाजयुमोच्या ३ दिवसीय संमेलनात सहभागी होणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, १३ ते १५ मे दरम्यान भाजयुमोचे (BJYM) ३ दिवसीय राष्ट्रीय अभ्यास वर्ग धरमशाला येथे आयोजण्यात आले आहेत. या संमेलनासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांबरोबर इतर राष्ट्रीय पातळीवरील नेतेही आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. तसेच क्रिडा क्षेत्रातून द्रविड आणि बबिता फोगाट सहभागी होणार आहेत.
भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अमित यांनी धरमशाला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “हे अभ्यास वर्ग १३ मे पासून धरमशाला येथे सुरू होणार आहे. या अभ्यास वर्गांचा शुभारंभ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा करतील. त्यांच्यासोबत बरेच राष्ट्रीय नेतेही तेथे उपस्थित असतील. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरही अभ्यास वर्गांना उपस्थिती लावतील. तसेच या अभ्यास वर्गात देशभरातील १३९ प्रतिनिधी येणार आहेत. हा कार्यक्रम सलग ३ दिवस चालेल.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बोलला पंत; म्हणे, ‘आमचे खेळाडू कोरोना आणि फ्लू आजाराने…’
सनरायझर्स विरुद्ध नाबाद ७३ धावा करणारा फाफ स्वत:ला करू इच्छित होता ‘रिटायर आऊट’, पण का?
उगाच कोहलीला म्हणत नाहीत ‘किंग’! वादळी खेळी खेळणाऱ्या कार्तिकसाठी ड्रेसिंग रूममध्ये केले असे काही