इंडियन प्रीमियर लीगची नवी फ्रँचायझी गुजरात टायटन्सचा स्टार अष्टपैलू राहुल तेवतिया याने शुक्रवारी (२० मे) आपला वाढदिवस साजरा केला. संघ सहकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाच्या हॉटेलमध्ये त्याने आपला २९वा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणी त्याची पत्नी रिद्धी पन्नू हीदेखील उपस्थित होती. दोघांनी एकत्रच केक कापला. तेवतियासाठी गुजरात संघाचे मस्त असा केक बनवून घेतला होता, ज्यावर तेवतिया आणि त्याच्या पत्नीचा फोटो होता.
तेवतियाची (Rahul Tewatia) पत्नी रिद्धी पन्नू (Ridhi Pannu) हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचे वाढदिवस साजरा (Rahul Tewatia Birthday Celebration) करतानाचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तेवतिया आणि रिद्धी मिळून केक कापताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत दोघे एकमेकांचा हात पकडून चालताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत रिद्धीने तेवतियाला टॅग केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, लव्ह’.
https://www.instagram.com/p/CdyBN7OqFr3/?utm_source=ig_web_copy_link
रिद्धीबरोबरच गुजरात संघानेही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तेवतियाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये गुजरात संघातील सर्व खेळाडू तेवतिया आणि त्याच्या पत्नीला घेरा बनवून उभे असल्याचे दिसत आहे. तर मध्ये उभा राहून तेवतिया आणि रिद्धी केक कापताना दिसत आहेत. तसेच अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खान बड्डे बॉय तेवतियाच्या चेहऱ्यावर केक लावताना दिसत आहे.
Humare bhai ka birthday, straight from #InTheLockerRoom 🎂🥳#AavaDe #SeasonOfFirsts #TATAIPL pic.twitter.com/WEMmhLue7z
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 20, 2022
गुजरात संघाने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘काही फिल्मी संवाद आणि खूप सारा केक. कारण राहुल भाऊचा वाढदिवस सर्वांनी साजरा केलाच असेल.’ तसेच व्हिडिओत गुजरात संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा म्हणताना दिसत आहेत की, ‘राहुल, नाव ऐकलेच असेल.’ यावर राशिद म्हणतो की, ‘आम्हाला तर फक्त तेवतिया आणि तेवतियाची भीती वाटते.’
दरम्यान तेवतियाने गुजरातला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. १४ सामने खेळताना ३१ च्या सरासरीने त्याने २१७ धावा केल्या आहेत. यादरम्यान नाबाद ४३ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
युवा हंगारगेकरला का दिली नाही एकाही सामन्यात संधी? धोनीने स्पष्ट केले कारण
‘अविश्वसनीय रूपाने फिट व्यक्ती आहे धोनी’, थालाच्या आयपीएल २०२३ खेळण्याच्या निर्णयावर बोलले शास्त्री
आयपीएलचा १५ वा हंगाम मुंबईसाठी ठरला खूपच वेगळा, संघाबाबत पहिल्यांदाच घडल्या ‘या’ तीन गोष्टी