आगामी वनडे विश्वचषकाचे सामने शुक्रवारी (29 सप्टेंबर) सुरू झाले. ऑस्ट्रेलिया आणि नेदर्लंड यांच्यातील सामना रंगात आला असताना पावसाने खेळ बिघडवला. शनिवारी (30 सप्टेंबर) एकूण दोन सराव सामने आयोजित केले गेले होते. पण पावसामुळे हे दोन्ही सामना रद्द केला गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना एकही चेंडू न खेळवता रद्द केला गेला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यातील सामना अर्ध्यातून रद्द करावा लागला.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील सराव सामना शनिवारी गुवाहाटीमध्ये आयोजित गेला गेला होता. तसेच ऑस्ट्रेलिया आणि नेदर्लंड यांच्यातील सामना त्रिवेंद्रममध्ये खेळला जात होता. उभय संघांतील ही लढत सुरू होण्याआधीच त्रिवेंद्रममध्ये जोरादार पाऊस आला होता. सामना खेळला जाणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. पण पंचांनी पाऊस थांबल्यानंतर 23 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदर्लंडने 14.2 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 84 धावा केल्या होत्या. पण तितक्यात पाऊस सुरू झाल्याने खेळ पुढे जाऊ शकला नाही. पंचांना अखेर हा सामना अनिकाली घोषित करावा लागला.
दरम्यान, पावसामुळे रद्द झालेला हा तिसरा सामना ठरला. शुक्रवारी एकूण तीन सराव सामने आयोजित केले गेले होते. यातील अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळेच रद्द केला गेला होता. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या एकूण पाच सराव सामन्यांपैकी तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. याच कारणास्तव चाहते आणि संघांची चिंता वाढताना दिसत आहे. 5 ऑक्टोबर रोजी भारतात वनडे विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. विश्वचषकात पावसाने आशा प्रकारे हजेरी लावू नये, अशा अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. (Rain winning against Warm-up matches AUS vs NED abandoned due to rain)
महत्वाच्या बातम्या –
स्टार्क ऑन फायर! वर्ल्डकपच्या सराव सामन्यातच केली कडक हॅट्रिकने सुरुवात
VIDEO: पंचांच्या वादग्रस्त निर्णयानंतर दोन्ही संघात तुंबळ हाणामारी, 6 जखमी