आयपीएल ही खाजगी क्रिकेट लीगमधील सर्वात मोठी लीग समजली जाते. जगभरातील क्रिकेटपटू यात खेळण्यासाठी प्रयत्नशील असता. आयपीएल म्हटलं की मुंबई इंडियन्स व चेन्नईच्या खेळाडूंची विशेष चर्चा होतं असते.
त्यात एमएस धोनी व रोहित शर्माची चर्चा तर विचारुच नका. याचबरोबर विराट कोहली व सुरेश रैनासारखे खेळाडूही मागे नाहीत. Raina, Rohit, Dhoni only Players to Score at least 1 Half Century in all IPL Seasons.
या लीगमध्ये एमएस धोनीने १९० सामन्यात १७० डावात फलंदाजी करताना ४२.२०च्या सरासरीने ४४३२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ अर्धशतकांचा समावेश आहे.
सुरेश रैनाने १९३ सामन्यात १८९ डावांत फलंदाजी करताना ३३.३४च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत. यात त्याने १ शतक व ३८ अर्धशतकं केली आहेत.
तर रोहित शर्माने १८८ सामन्यात १८३ डावात फलंदाजी करताना ३१.६०च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. यात त्याने १ शतक व ३६ अर्धशतकं केली आहेत.
आयपीएलचे आजपर्यंत १२ हंगाम झाले आहेत आणि केवळ धोनी, रैना व रोहितने या बाराही हंगामात कमीतकमी एकतरी अर्धशतक केले आहे. बाकी कोणत्याही खेळाडूला हा कारनामा करता आलेला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
–भारताचे दिग्गज क्रिकेटपटू व त्यांनी सुरु केलेली अलिशान हाॅटेल्स
-वनडेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ महान गोलंदाज
-जो विक्रम भारताच्या नावावर हवा होता तो आहे पाकिस्तानच्या नावावर
-भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने