मुंबई । भारताचा स्टायलिश फलंदाज सुरेश शर्मा आणि धडाकेबाज फलंदाज रोहीत शर्मा यांच्यात मैत्रीचे घनिष्ठ संबंध आहेत. रविवारी दोघांनीही सोशल मीडियावर एक जुना इमोशनल फोटो शेअर करून मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजळा दिला. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा ‘फॅब फोर’ आणि ‘फॅब टू’च्या सुवर्ण काळातून भारतीय क्रिकेटची धुरा या युवकांच्या हाती येत होती.
रोहितने पोस्ट केलेला फोटो 2009 सालच्या न्यूझीलंड दौऱयाच्या वेळचा आहे. फोटोमध्ये फिरकीपटू प्रज्ञान ओझा आणि सुरेश रैना दिसत आहे. फोटोच्या पाठीमागे पर्वत आणि हिरवेगार निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. या तिघांचाही न्यूझीलंडचा हा पहिला दौरा असल्याचेही रोहित शर्माने फोटो कॅप्शन द्वारे सांगितले आहे. प्रज्ञान ओझाचे गोड स्मितहास्य रोहितला आवडले असल्याचेही सांगितले. रोहितने शेअर केलेला हा फोटो क्रिकेट फॅन्सला खूप आवडला असून काही वेळातच याला दहा लाख लोकांनी लाइक केले आहे.
https://www.instagram.com/p/CAhtPmkhchk/
रैनाने देखील हा फोटो बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाण्यासोबत हा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर इस बेढंगी दुनिया के संगी हम ना होते यारा, अपनी तो यारी अतरंगी है रे’ हे गीत फोटोसोबत शेअर करून जुन्या मैत्रीच्या आठवणीना उजाळा दिला आहे.
https://www.instagram.com/p/CAiYQrSpzkr/
रोहित आणि रैना यांच्यानंतर भारताचा फिरकीपटू प्रज्ञान ओझा याने देखील इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. मैत्रीचे ते दिवस खूप चांगले होते असे देखील ओझा म्हणतोय. या दौऱ्यानंतर प्रज्ञान ओझा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शंभरपेक्षा जास्त गडी बाद केले आहेत. एमएस धोनीने प्रज्ञान ऐवजी रवींद्र जडेजाला जास्तीत जास्त संधी दिल्याने प्रज्ञान ओझाचे क्रिकेट करिअर संपल्याचे अनेकांचे मत आहे.