शनिवारी (२५ सप्टेंबर) आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३३ धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले आहे. दरम्यान पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या नावावर नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघासमोर १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र राजस्थान रॉयल्स संघाला अवघ्या १२१ धावा करता आल्या. ज्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे, पावरप्लेच्या षटकांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या फलंदाजांना आलेले अपयश. या संघातील फलंदाजांना पावरप्लेच्या षटकात एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने पावरप्लेच्या बाबतीत या हंगामातील नव्हे तर संपूर्ण आयपीएल इतिहासातील निराशाजनक कामगिरी केली आहे. आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदाच असे घडले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पावरप्लेमध्ये अवघ्या २१ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये एकही चौकार किंवा षटकाराचा समावेश नव्हता. तसेच त्यांनी आपल्या ३ विकेट्सही गमावल्या होत्या.
राजस्थान रॉयल्स संघापूर्वी अशी नकोशी कामगिरी चेन्नई सुपर किंग्स संघाने केली होती. २०११ मध्ये झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला अवघ्या १५ धावा करण्यात यश आले होते. यादरम्यान एकही चौकार किंवा षटकार मारता आला नव्हता.
आयपीएल २०२१ स्पर्धेत पावरप्लेच्या षटकांमध्ये सर्वात कमी धावा
२१/३ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२१/१- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स
२४/४ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२५/१- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ६ बाद १५४ धावा केल्या होत्या. यामध्ये श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली होती. तर हेटमायरने २८ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. कर्णधार संजू सॅमसनने एकहाती झुंज देत नाबाद ७० धावांची खेळी केली. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाची साथ न मिळाल्याने राजस्थान रॉयल्स संघाला अवघ्या ६ बाद १२१ धावा करण्यात यश आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३३ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
बुढ्ढे में है दम! वयाच्या ४२ व्या वर्षीही ख्रिस गेलने रचला इतिहास, मोडला द्रविडचा अनोखा विक्रम