भुवनेश्वर, २९ डिसेंबर: अल्टीमेट खो-खो चा सीझन दोन कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुर आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी सुरु केलेली ल्टीमेट खो खो पहिल्या सीझनमध्ये जबरदस्त हिट ठरली होती जी भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने बिगर क्रिकेट स्पर्धा म्हणून उदयास आली. अल्टीमेट खो-खो हि पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेला यूके स्थित बीएनपी ग्रुपने निधीची उपलब्धता करून दिली आहे. अल्टीमेट खो-खो चे सर्व सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील. आजच्या पहिल्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने राजस्थान वॉरियर्सचा ४ गुणांनी पराभव केला.
आज झालेल्या आठव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने राजस्थान वॉरियर्स वर ३१ – २७ (मध्यंतर १३-१३) असा ४ गुणांनी विजय मिळवला. चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. शेवटच्या टर्न पर्यंत रोमांचक ठरलेला हा सामना अखेर चेन्नई क्विक गन्सच्या आक्रमकांनी खेचून आणला. मध्यंतरापर्यंत अतिशय अटीतटीचा ठरलेला हा सामना सर्वांचे लक्ष खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला. मात्र गुणतालीकेत शेवटी असलेल्या राजस्थान वॉरियर्सची या सामन्यात निराशाच झाली.
पहिल्या टर्न मध्ये राजस्थान वॉरियर्सने प्रथम आक्रमण करताना १० गुण मिळवले. या दरम्यान चेन्नई क्विक गन्सच्या संरक्षकांनी ड्रीम रन्सचे ३ गुण वसूल केले तर चेन्नई क्विक गन्स यांनी सुध्दा पहिल्या टर्न मध्ये आक्रमणात १० गुणच वसूल केल तर राजस्थान वॉरियर्सच्या संरक्षकांनी ड्रीम रन्सचे ३ गुण वसूल केले. म्हणजेच मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी गुणांची हुबेहूब बरोबरी केली होती.
मध्यंतरानंतर मात्र राजस्थान वॉरियर्सने आपल्या आक्रमणाला अजून धार आणली व ड्रीम रन देता १४ गुण वसूल केले व चेन्नई क्विक गन्सला एक दमदार आव्हान दिले. शेवटच्या म्हणजे चौथ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सच्या आक्रमकांनी पहिल्या सव्वा दोन मिनिटाच्या आत राजस्थान वॉरियर्सची पहिली तुकडी बाद करण्यात यश मिळवले. तर पावणे चार मिनिटाच्या आत राजस्थान वॉरियर्सची दुसरी तुकडी बाद करण्यात यश मिळवून विजयाकडे वाटचाल सुरु केली. चेन्नई क्विक गन्सने राजस्थान वॉरियर्सची तिसरी तुकडी साडे सहा मिनिटात बाद केल्याने त्यांचा विजय निश्चित झाला. मात्र शेवटच्या अर्ध्या मिनिटात एकही खेळाडू बाद झाला नाही.
या सामन्यात सुमन बर्मन (२.४४ मि. संरक्षण केले) तर रामजी कश्यपने अष्टपैलू खेळी करताना चेन्नई क्विक गन्सला संघर्षातून सहज विजय मिळवून दिला. या सामन्यात सचिन भार्गवला सामन्यातील आक्रमक, सुमन बर्मनला सामन्यातील संरक्षकाचे तर रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या –
पहिल्या पीडीएफए फुटसाल लीग स्पर्धेत डेक्कन इलेव्हन संघाची विजयी मालिका कायम
SA vs IND । टीम इंडियासाठी गुड न्यूज! केपटाऊन कसोटीत महत्वाचा खेळाडू करणार पुनरागमन