आयपीएल 2023 हंगाम सुरू होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी एक वाईट बातमी समोर आली होती. आरसीबीचा युवा फलंदाज रजत पाटीदार याला दुखापत झाल्यानंतर त्याला संपूर्ण आयपीएल हंगामातून माघार घ्यावी लागली होती. अशात आता पाटीदारच्या दुखापतीविषयी नवीन माहिती समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार पाटीदारच्या दुखापतीवर शस्त्रक्रियेची गरज आहे आणि बीसीसीआय यासाठी येणारा सर्व खर्च करेल.
मध्य प्रदेशचा हा स्टार क्रिकेटपटू सध्या टाचेच्या दुखापतीने त्रस्त आहे. पाटीदारच्या डाव्या टाचेला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे लवकरच त्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. क्रिकबजच्या माहितीनुसार बीसीसीआय (BCCI) शस्त्रक्रियेसाठी पाटीदारला इंग्लंडला पाठवणार आहे. तसे पाहिले तर बीसीसीआय फक्त त्याच खेळाडूंवर खर्च करते, ज्या त्यांच्यासोबत वार्षीक करार केला गेला आहे. मात्र, पाटीदारसोबत बीसीसीआयचा कोणताच करार नसला, तरीही बोर्ड त्याच्या दुखापतीनंतर सर्व खर्च करणार आहे. पाटीदारला चांगले उपचार मिळावे, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलरच्या माहितीनुसार असे म्हटले गेले आहे की, “दुर्दैवाना रजत पाटीदार (Rajat Patidar) टाचेच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर झाला आहे. रजत लवकरात लवकर बरा व्हावा अशी आमची आपेक्षा आहे. या प्रक्रियेत आम्ही त्याच्या सोबत आहोत.” दरम्यान रजत पाटीदारने आयपीएल 2022 मध्ये आरीसीबीसाठी तुफान फलंदाजी केली होती. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळलेल्या एलिसमिनेटर सामन्यात पाटीदारने नाबाद 112 धावांची खेळी करून संघाला क्लालिफायर सामन्यापर्यंत पोहोचवले होते.
दरम्यान, मागच्या काही दिवासंपासून बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रजत पाटीदार रिहॅब करत होता. एनसीए कर्मचाऱ्यांच्या नजरेखाली त्याने आपल्या फिटनेसवर काम केले. लवकरच त्याला इंग्लंडचा विजा मिळेल आणि तो शस्त्रक्रियेसाठी इंग्लंडला रवाणा होईल. (Rajat Patidar will go to England for surgery and BCCI will bear all the expenses)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एमएस धोनीचा मोठा विक्रम उध्वस्त! न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवता बाबरचा वर्ल्ड रेकॉर्ड
स्ट्राईक रेटची चर्चा होत असतानाच राहुल ठरला सर्वात वेगवान! ‘या’ यादीत अव्वल नंबर