देशात सध्या सर्वत्र बहिण-भावामधील अतूट नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन साजरा होत आहे. या दिवशी बहिण तिच्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला सर्व संकटांपासून तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो. भारतीय क्रीडापटूही रक्षाबंधन साजरा करताना दिसत आहेत. अशातच नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकहून मायदेशात परतलेल्या भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने सुद्धा रक्षाबंधन साजरा केला आहे.
विनेश फोगटने सोमवारी (19 ऑगस्ट) तिच्या गावी बलाली येथे रक्षाबंधनाचा सण साजरा केला. विनेशने भाऊ हरविंदर फोगटला राखी बांधली. यावेळी तिच्या भावाने तिला एक खास भेटवस्तूही दिली, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
ती खास भेट कोणती?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विनेश फोगटने आपल्या भावाकडून मिळालेल्या भेटवस्तूबद्दल एक मजेदार टिप्पणी केली आहे. व्हिडिओमध्ये विनेश 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलसोबत दिसत आहे. यावर विनेश हसली आणि म्हणाली, “मी आता 30 वर्षांची झाली आहे. आधी 10 रुपये, मग मागच्या वर्षी माझ्या भावाने मला 500 रुपये दिले होते आणि यावेळी (नोटांचा बंडल दाखवत) त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्याची कमाई मला दिली आहे.” या भेटीवर विनेशच्या भावाच्या चेहऱ्यावरील हसूही पाहण्यासारखे होते.
विनेश फोगाट को राखी बांधने पर मिला बंपर गिफ्ट pic.twitter.com/ZA7T9uZy3L
— Mohammad Wahid 🇮🇳 (@wahidlucknavi) August 19, 2024
विनेश फोगटचे जंगी स्वागत
दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्यानंतर विनेशला मोठ्या निराशेला सामोरे जावे लागले. 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन अधिक आढळल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. असे असले तरीही, विनेश फोगटचे भारतात परतल्यावर जोरदार स्वागत झाले. 50 किलो महिला कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्रतेचा सामना केल्यानंतर विनेश शनिवारी (17 ऑगस्ट) दिल्लीत पोहोचली तेव्हा तिच्या स्वागतासाठी हजारो लोक विमानतळावर उपस्थित होते. तिला तिच्या बलाली गावात पोहोचण्यासाठी सुमारे 13 तास लागले, जिथे तिचे कुटुंब आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने स्वागत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
आवडता विरोधी संघ कोणता मुंबई इंडियन्स की कोलकाता? कोहलीनं दिलं मजेशीर प्रत्युत्तर
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!
ईशान किशनचा जोरदार कमबॅक! शेवटच्या ओव्हरमध्ये तुफानी षटकार मारत मिळवून दिला विजय