काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने अशी माहिती दिली होती की, पुढच्या वर्षीपासून आयसीसीच्या वार्षीक नियोजनात आयपीएलसाठी अडीच महिना राखीव ठेवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमिझ राजा नाराज आहेत. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील या वादादरम्यान रमीज राजा यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बीसीसीआय अध्यक्षांनी त्यांना आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते, ते देखील दोन वेळा.
पीसीबी अध्यक्ष रमिझ राजा (Ramiz Raja) यांनी दावा केला आहे की, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मागच्या वर्षी त्यांना आयपीएल फायनल पाहण्यासाठी दोन वेला बोलावले होते. क्रिकेटच्या दृष्टीने पाहिले तर, मी जायला हवे होते, पण त्याचा काय परिणाम होईल आणि चाहत्यांची काय प्रतिक्रिया असेल ? या सर्व गोष्टींमुळे मी गेलो नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याविषयी देखील रमिझ राजा बोलले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानची इच्छा आहे की, त्यांना भारताविरुद्ध खेळावे. पण दोन्ही देशांतील राजकीय संबंध सद्या तशी परवानगी देत नाहीत. मी यासंदर्भात सौरव गांगुलींसोबत देखील चर्चा केली आहे. सध्या क्रिकेटपटूच स्वतःच्या बोर्डचे नेतृत्व करत आहेत. अशात आता हे शक्य झाले नाही, तर मग कधी होईल.
दरम्यान, पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात सध्या वातावरण तापलेले दिसत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली आहे की, आयसीसी पुढच्या वर्षीपासून आयपीएलसाठी त्यांच्या वार्षीक नियोजनात अडीच महिन्याची विंडो राखीव ठेवणार आहे. आयसीसीने जर असा निर्णय घेतला, तर त्याचा थेट फटका पीसीबीला बसणार, यात काहीच शंका नाही.
आयसीसीने जर आयपीएलसाठी अडीच महिना राखीव ठेवला, तर त्यादरम्यान एकही आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार नाही. पाकिस्तानला देखील या काळात एकही सामना खेळणे शक्य होणार नाही. जगातील इतर सर्व संघांचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभाग देखील घेता येत नाही. आयपीएलच्या सुरुवातीला पाकिस्तानी खेळाडूंना सहभागी केले गेले होते, परंतु त्यांच्या वाढच्या आतंकवादी कारवाया लक्षात घेऊन बीसीसीआयने नंतर त्यांना स्पर्धेत सामील न करण्याचा निर्णय घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: पंतचा निराळा अंदाज, उमेश यादवच्या चेंडूवर जमिनीवर लोळत लगावला षटकार
चाळीस वय व्हायच्या आधीच ‘या’ क्रिकेटपटूंचे झाले निधन, एकटा तर २२व्या वर्षीच गेला देवाघरी
दिनेश कार्तिकप्रमाणे धडाकेबाज पुनरागमन करू पाहणारा मुरली विजय सपशेल फ्लॉप, एकेरी धावेवर आऊट