महाराष्ट्रात पुणे, नागपूर आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक क्रिकेट खेळले जातात. त्याचबरोबर नागपूर, मुंबई, पुणे या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्टेडियम असून तेथे जागतिक स्तरावरील सामनेही होतात. त्याचबरोबर पुणे आणि मुंबई येथे इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलचेही सामने होतात. अशातच आता सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. क्रिकेटरसिकांनाही सोलापूर येथेही क्रिकेटचे सामने पाहण्यास मिळणार आहेत. सोलापूरमध्ये रणजी ट्रॉफीचे सामने खेळवण्यात येणार आहेत.
सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमची (Indira Gandhi Stadium) खेळपट्टी सामने खेळण्यास पूरक आहे, असा रिपोर्ट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे येथे रणजीचे सामने खेळवण्यास काहीच हरकत नाही. नुकतेच या स्टेडियमचे नूतनीकरण स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी स्टेडियम-
हे स्टेडियम सोलापूर शहराच्या शहराच्या मधोमध आहे. प्रशासकिय विभागाने दुर्लक्ष केल्याने या स्टेडियमची दुरवस्था झाली होती. यावर तोडगा काढण्यासाठी फक्त चर्चाच होत राहिल्या, मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या स्टेडियमचे पूर्णपणे चेहराच बदलला आहे.
सोलापुराच्या इंदिरा गांधी स्टेडियमची वैशिष्ट्ये-
मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेले हे मैदान आहे. या मैदानाचे क्षेत्रफळ 22 हजार स्क्वेअर मीटर इतके आहे. तसेच 25 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी स्टेडियमची क्षमता आहे.
या स्टेडियमला अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ही सुविधा असल्याने पावसानंतर सामना लवकरात लवकर सुरू होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रेड 1 चे सामने होऊ शकतील अशी संपूर्ण व्यवस्था आहे. क्रिकेट सोबतच या ठिकाणी टेबल टेनिस, हॉलीबॉल, स्विमिंग टॅंक, लॉन टेनिस इत्यादी खेळांची मैदाने विकसित करण्यात आली आहेत.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नूतनीकरण झालेल्या या मैदानावरील धावपट्टीची शहानिशा करण्यासाठी 19 वर्षांखालील मुलींची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीसाठी राज्यभरातून नऊ संघ सहभागी झालेत. यामध्ये खेळलेल्या खेळाडूंच्या पसंतीस देखील हे मैदान उतरत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून या मैदानावरील धावपट्टीचे निरीक्षण करण्यात आले आहे. तेव्हा तपासणी समितीच्या तपासणीत इथल्या धावपट्टी एकदम यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे भविष्यात इथे रणजी, टूलीप असे सामने होऊ शकतात अशी आशा क्रिकेट रसिकांना आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“विलियम्सनला कर्णधार म्हणून हटविण्याची वेळ आली”; न्यूझीलंडच्याच दिग्गजाने व्यक्त केले रोखठोक मत
षटकार ठोकल्यावर स्मिथने केलेल्या कृतीने सारेच झाले चकीत; पाहा व्हिडिओ
सेंच्यूरी ठोकत स्मिथ पोहोचला रोहितच्या नजीक; शतकवीर कोहली, रूटच्या मांदियाळीत सामील