रणजी ट्रॉफी २०२२ ची दुसऱ्या फेरीतील सर्व सामने रविवारी (२७ फेब्रुवारी) संपले. प्लेट गटातील सामन्यात सिक्कीम आणि बिहारचा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात १३०० हून अधिक धावा झाल्या आणि २० विकेट पडल्या, पण सामन्याचा निकाल लागला नाही. पहिल्या डावातील आघाडीवर सिक्कीमला ३, तर बिहारला एक गुण मिळाला. पॉईंट टेबलमध्ये बिहार ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि सिक्कीम ३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. प्लेट गटाकडे पाहता नागालँडने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले असून १३ गुणांसह संघ अव्वल आहे.
रविवारी सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी सिक्कीमने पहिल्या डावात ६ बाद ५३९ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. क्रांती कुमार २७० धावांवर नाबाद राहिला, परंतु शेवटच्या दिवशी त्याला त्रिशतक झळकावता आले नाही. तो २८७ धावा करून बाद झाला. संघाने ८ बाद ६७३ धावा करून डाव घोषित केला. आशिष थापा १५१ धावांवर नाबाद राहिला. बिहारने पहिल्या डावात ९ बाद ४३१ धावा केल्या. सिक्कीमने पहिल्या डावाच्या आधारावर २४२ धावांची आघाडी मिळाली.
प्रथम श्रेणी पदार्पणात त्रिशतक झळकावले अशी कामगिरा करणारा साकीबुल गनी हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या सामन्यातही त्याने धमाकेदार कामगिरी केली. पहिल्या डावात ९८ धावा करून तो बाद झाला. बिहारकडून खेळताना तो दुसऱ्या डावात १०१ धावांवर नाबाद राहिला. यावेळी त्याने १०३ चेंडूं खेळत १८ चौकार मारले. त्याच्या विक्रमाचे जगभरातून कौतुक केले गेले. या अगोदरही त्याने द्विशतक लगावली आहेत. त्याच्याशिवाय यशस्वीही ११२ धावांवर नाबाद राहिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा संघाने ३ बाद २६३ धावा केल्या होत्या.
या ४ दिवसीय सामन्यात एकूण १३६७ धावा केल्या आणि २० विकेट गेल्या. तिसऱ्या फेरीचे सामने ३ मार्चपासून सुरू होतील. कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली होती. १७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भविष्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचे मोठे पाऊल, युवा खेळाडूंसाठी करणार ‘ही’ महत्त्वाची गोष्ट
चार टी२० सामने, जेव्हा भारतीय यष्टीरक्षक बनले ‘सामनावीर’; पण धोनीचे मात्र नाव नाही