पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानमध्ये पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यात येथे तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी२० सामना खेळवला जाणार आहे. रविवारी (२७ फेब्रुवारी) पाकिस्तानात पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली असून दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची ही पहिलीच परदेशातील कसोटी मालिका आहे. सध्या अँड्र्यू मॅकडोनाल्ड हे तात्पुरते ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान आर्मी आणि ४००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अनेक इमारतींवर स्नायपरही तैनात करण्यात आले आहेत. क्रिकेट स्टेडियमजवळील खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पार्कही बंद केले आहेत. संघाच्या प्रवासादरम्यान मोबाईल सेवा बंद राहील आणि मेट्रो-बसचा संख्या मर्यादित असेल.
यापूर्वी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता, मात्र कोणताही सामना न खेळता परतला होता. त्याचबरोबर इंग्लंडनेही आपला दौरा सुरू होण्यापूर्वीच रद्द केला होता. न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण सांगून त्यांचा दौरा रद्द केला होता. याच कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेत कोणतीही कसर सोडण्याचा प्रयत्न करत नाही.
Arrived in ???????? pic.twitter.com/pnis0ckFeO
— Steve Smith (@stevesmith49) February 27, 2022
साल २००९ मध्ये जेव्हा श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता, तेव्हा हल्ला झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात नाही. श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेसारख्या संघांनी येथे दौरे केले आहेत. परंतु, मोठ्या संघांनी पाकिस्तानमध्ये सामने खेळलेले नाहीत.
ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. यापूर्वी १९९८ साली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान दौरा केला आहे.
The Aussies have arrived in ???????? for their first away Test series since mid-2019 and captain Pat Cummins is keen to make sure they bring the same ‘relentless’ style of play they had at home this summer #PAKvAUS pic.twitter.com/GSsS9qQNbV
— cricket.com.au (@cricketcomau) February 27, 2022
४ मार्चपासून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका पार पडणार आहे. पहिला सामना ४ ते ८ मार्च दरम्यान रावळपिंडी येथे खेळला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना १२ ते १६ मार्च दरम्यान कराची, तर तिसरा कसोटी सामना २१ ते २५ मार्चदरम्यान लाहोर येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर या दोन संघामध्ये तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना २९ मार्च, दुसरा ३१ मार्च, तर तिसरा सामना २ एप्रिलला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने रावळपिंडी येथे खेळले जाणार आहेत. तसेच ५ एप्रिलला रावळपिंडी येथे टी२० मालिका खेळली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन कसोटी संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), ऍश्टन आगर, स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, मार्क स्टेकेटी, मिशेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर.
महत्त्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफी: ‘या’ सामन्यात झाल्या तब्बल १३६७ धावा, पण निकाल अनिर्णितच
भविष्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचे मोठे पाऊल, युवा खेळाडूंसाठी करणार ‘ही’ महत्त्वाची गोष्ट