भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता खुप काही बदल होणार असल्याचे दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबद्दल विशेष चिंतन केले असून सचिव जय शहा यांनी क्रिकेट बद्दल काही नवीन कल्पना सांगितल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देशांतर्गत क्रिकेटच्या 2024-25 हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी काही बदल सुचवले आहेत. बीसीसीआयने त्यानुसार देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे निर्णय घेतल्याचे समजत आहे.
मागील रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याने सलग सामन्यांमुळे थकवा येत असल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीवर परिणाम होत असल्याचे लक्षात आल्याने बीसीसीआयने आगामी रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्याचे निश्चित केले आहे. ( Ranji Trophy split into two parts no toss in CK Nayudu National Selectors to pick Duleep Trophy squads )
त्यानुसार, देशांतर्गत क्रिकेटला दुलीप ट्रॉफीने सुरुवात होईल. त्यानंतर इराणी ट्रॉफी आणि रणजी करंडक स्पर्धेतील पहिले पाच लीग सामने होतील. हे सर्व झाल्यानंतर काही काळाचा गॅप असेल. त्या दरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवल्या जातील. या स्पर्धा झाल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेच्या दोन साखळी सामने व बाद फेरीचे सामने होतील.
दरम्यान जय शाह यांनी सीके नायुडू ट्रॉफी 23 वर्षांखालील स्पर्धेतून टॉस हद्दपार करण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवला. या स्पर्धेत पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी की गोलंदाज याचा निर्णय घेण्याचा मान मिळेल आणि नवीन गुणपद्धतही लागू करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वरिष्ठ स्तरावरही त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे सागितले जात आहे.
अधिक वाचा –
– “माझं काय आहे, हे तर माझं शेवटचं आहे”, रोहित शर्माचा केकेआरच्या प्रशिक्षकासोबत संभाषणाचा व्हिडिओ लीक
– रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी, आता ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व
– रोमहर्षक सामन्यात केकेआरचा मुंबईवर 18 धावांनी विजय, हर्षित राणा ठरला विजयाचा हिरो