Ranji Trophy : सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरु आहे. अशातच भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण अरुणने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच वयाच्या 34 व्या वर्षी वरुण अरुण झारखंडकडून राजस्थान विरुद्ध शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळत आहे.
वरुण अरुणने 2008 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याने 16 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 65 सामने खेळले असून त्याने 168 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच, वरुण अरुणचाला टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पण वरुणची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकली नाही.
याबरोबरच वरुण अरुणला 2011 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तसेच 2015 पर्यंत वरुण अरुण टीम इंडियामध्ये ये-जा करत होता. वरुण अरुणने 2015 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तर वरुणने 9 कसोटी सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. 2011 मध्ये वनडे कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर वरुण अरुणने 2014 पर्यंत 9 वनडे खेळले आणि 11 विकेट घेतल्या आहेत.
तसेच निवृत्तीची घोषणा करताना वरुण अरुण म्हणाला आहे की, “मी 2008 पासून लाल चेंडूचे क्रिकेट खेळत आहे. मी नेहमीच वेगवान गोलंदाजी केली आहे. यामुळे मी पुन्हा पुन्हा जखमी झालो. आता माझे शरीर सहकार्य करत नाही. मला फार वेगवान चेंडू टाकता येत नाही. त्यामुळेच मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, वरुण अरुण झारखंडसाठी जमशेदपूरमध्ये शेवटचा सामना खेळत आहे. तसेच याच मैदानातून वरुण अरुणने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर. 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना वरुण अरुणच्या बाऊन्सरने इंग्लंडचा स्टार क्रिकेटर स्टुअर्ट ब्रॉडचे नाक तुटले होते. तसेच वरुण अरुण असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे सतत 150 किलोमीटर वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता होती.
महत्वाच्या बातम्या –
- NZ Vs SA : न्यूझीलंडनं संपवला 92 वर्षांचा दुष्काळ! केन विल्यमसनने गेल्या 7 सामन्यात झळकावली सात शतके
- सूर्यकुमारमुळे नौशाद खान पाहू शकले सरफराजचे कसोटी पदार्पण, पाहा स्टार फलंदाजाशी काय आहे कनेक्शन?