भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत चार सामन्यांनंतर भारतीय संघ २-२ ने बरोबरीवर आहे. या मालिकेत भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले आहे. याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. तसेच तिसऱ्या टी२० सामन्यात जोस बटलरने ८३ धावांनी खेळी करत भारतीय संघाकडून सामना हिसकावून घेतला होता. या सामन्यातील पराभवानंतर प्रसिद्ध सिने अभिनेता रणवीर सिंगने एक ट्विट केले होते. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघातील मुख्य फलंदाज लवकर गारद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहीलीने ७७ धावांची खेळी करत,भारतीय संघाला १५६ धावांपर्यंत पोहचवले होते. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या भारतीय गोलंदाजांना १५७ धावांचा बचाव करता आला नाही. परिणामी भारतीय संघाने हा सामना गमावला होता.
या सामन्यानंतर अभिनेता रणवीर सिंग ने,जसप्रीत बुमराहच्या कौतुकाचे पुल बांधत ट्विट केले होते. त्याने लिहिले होते की, “काही नाही. फक्त वाट पाहा, जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची. ही एक वेगळीच गोष्ट असेल.” त्याने बुमराह संघात पुनरागमन केल्यावर भारतीय संघ आणखी मजबूत होईल अशी आशा व्यक्त करत हे ट्विट केले आहे.
https://twitter.com/RanveerOfficial/status/1371869910452760584
बुमराह अडकला विवाहबंधनात
जसप्रीत बुमराहने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली असे म्हटले जात होते. परंतु नंतर तो विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती.अखेर १५ मार्च रोजी त्याने संजना गणेशन सोबत विवाह केला. हा विवाह सोहळा गोव्यामध्ये पार पडला. हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता.
बुमराह इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी देखील उपलब्ध नसणार आहे. येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान तो थेट मुंबई इंडियन्स संघाच्या सराव शिबिरात हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
उडता बेन! स्टोक्सचा एकहाती झेल पाहून व्हाल चकित, व्हिडिओ होतोय व्हायरल
Video: आऊट की नॉटआऊट? सुर्यकुमार, सुंदरची विकेट ठरली वादग्रस्त, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
भारतात रोहितच ‘सिक्सर किंग’! पहिल्या चेंडू षटकार मारत ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय






