मुंबई । जगभर कोरोना या महाभयंकर विषाणूने रौद्ररूप धारण केले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपापल्या घरांमध्ये आहेत. मैदानात सराव करण्यास बंदी असल्याने क्रिकेटपटू घरातच सराव करत आहेत. याच दरम्यान, अफगाणिस्तानचा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू राशिद खान घरातच फलंदाजीचा सराव करत आहे.
फलंदाजीचा सराव करताना नव्या दमाचा हा राशिद खान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ यांची नक्कल करतोय. हा नक्कल करतानाचा व्हिडिओ राशिद खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. स्मिथची फलंदाजीची आगळी वेगळी शैली प्रसिद्ध आहे. राशिदचा व्हिडिओ आयपीएल फ्रेंचाइजी सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच क्रिकेट फॅन्सला देखील हा व्हिडिओ खूपच आवडला आहे.
गोलंदाजांना श्वासही घेऊ न देणारा स्टीव स्मिथ सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेट पैकी एक आहे. ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणानंतर त्याने क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन करत धावांचा ‘बँक बॅलन्स’ धडाधड वाढवतोय.
https://www.instagram.com/p/CA7tbPHDWBG/?utm_source=ig_embed
राशिद खान काही हा सध्या आयसीसी क्रिकेट टी-20 क्रमवारीत अव्वल गोलंदाज आहे. त्याने आपल्या कामगिरीने तसेच त्याची रेखीव आणि शिस्तबद्ध गोलंदाजी साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. दिवसेंदिवस तो एक परिपक्व गोलंदाज म्हणून विकसित होऊ लागला आहे. गोलंदाजी करताना धावा कमी देण्यात फारच कंजुषी करतो. त्याने आतापर्यंत 4 कसोटी, 71 एकदिवसीय आणि 48 टी- 20 सामने खेळला असून त्यात त्याने कसोटीत 23, एकदिवसीय 133 आणि टी-20 मध्ये 89 बळी घेतले आहेत.