---Advertisement---

राशिदचा आबुधाबीत जलवा; सामन्यात ५ विकेट्स घेत सलग दुसऱ्यांदा जिंकला सामनावीर पुरस्कार

On: शनिवार, जून 12, 2021 2:22 AM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार तसेच आपल्या फिरकीच्या तालावर मोठमोठ्या फलंदाजांना नाचवणारा गोलंदाज म्हणजे राशिद खान होय. आपल्या फिरकी गोलंदाजी करीत ओळखला जाणारा राशिद खान फलंदाजीमध्ये सुद्धा मोठे शॉट्स खेळून चेंडू सीमेपार टोलवण्याची क्षमता बाळगून आहे. सध्या राशिद पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेनिमित्त आबुधाबीत असून तो तिथे आपला दणका उडवतोय.

पीएसएलच्या सहाव्या हंगामाचा दुसरा भाग युएईमध्ये सुरू होताच, अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानने तिथे दणका उडवून दिलाय. लाहोर कलंदर संघाकडून खेळतांना राशिदने पेशावर जालमी संघाविरुद्ध तब्बल 5 बळी घेऊन सामनावीर किताब पटकावला. तो लागोपाठ दुसऱ्यांदा सामनावीर ठरला. यापुर्वी इस्लामाबाद युनायटेड संघाविरुद्ध देखील त्याने जबरदस्त कामगिरी केली होती.

लाहोर आणि पेशावर दरम्यान झालेल्या सामन्यात लाहोरने 10 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करतांना लाहोरने 170 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देतांना पेशावर राशिद खानच्या गोलंदाजीसमोर लडखडली आणि 160 धावाच करू शकली. राशिदने 20 धावा देऊन बहुमूल्य 5 बळी घेतले. डेविड मिलर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, फेबियन एलेन, आणि वहाब रियाझ हे त्याचे शिकार ठरले.

बॅटने देखील केली कमाल:-

याआधीच्या सामन्यात इस्लामाबाद संघाविरुद्ध खेळतांना राशिदने 9 धावा देऊन 1 बळी टिपला होता. त्यासोबतच त्याने आपल्या फलंदाजीत सुद्धा दमखम दाखवला होता. त्याने 5 चेंडूवर 3 चौकरांच्या मदतीने नाबाद 15 धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. इस्लामबादने 144 धावांच लक्ष ठेवले होते जे लाहोर संघाने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.

कोरोना महामारीमुळे पीएसेल पहिल्या काही सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती. उर्वरित सामने आता युएईमध्ये खेळल्या जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

सचिन तेंडुलकरने कधीही केली नाही दारुची जाहीरात; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

हा खेळ आकड्यांचा! ‘हा’ भारतीय गोलंदाज नेहमीच ठरतो न्यूझीलंडला त्रासदायक

श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश झाला ‘हा’ खेळाडू, शेअर केली भावनिक पोस्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---