भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी (१० जून) श्रीलंका दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. विराट कोहली, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्याचबरोबर, निवड समितीने देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, चेतन सकारिया, नितीश राणा अशा आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची संघात निवड केली.
मात्र, यादरम्यान भारतीय संघात निवडीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक खेळाडूंचे अंतःकरणही तुटले. त्यातील एक नाव म्हणजे वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल. संघात निवड न झाल्याने सिद्धार्थने आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक भावनिक संदेश ट्विट केला आहे.
आयुष्यात अनेकदा पडलो आहे
सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय युवा संघाने २००८ मध्ये एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्या संघाचा भाग असलेल्या सिद्धार्थने ट्विट करताना लिहिले, ‘मी माझ्या आयुष्यात सतत पडत आलो आहे आणि यामुळेच मी यशस्वी झालो. जेव्हा मी अयशस्वी होतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक हास्य येते, जे मला अधिक परिश्रम करण्यास प्रवृत्त करते.’
I have failed over and over again in my life and that is why I succeed. And when I fail I have the smile on my face which motivates me work even harder. #fridayfitness #fridaymorning #smile #cricketer #cricket #trending @SunRisers #indiancricketteam #Cricket #IndianCricketTeam pic.twitter.com/IDZE1ptKHR
— Siddharthh Kaul (@iamsidkaul) June 11, 2021
सिद्धार्थने भारताकडून तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळले आहेत. मात्र, आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असताना या वेगवान गोलंदाजाची कामगिरी काही खास नव्हती. युएईमध्ये होणार्या आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात जोरदार कामगिरी करून सिद्धार्थकडे निवडकर्त्यांना प्रभावित करण्याची संधी असेल.
निवडीवरून चर्चेला आले उधाण
श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली व शिखर धवनच्या नेतृत्वात २० सदस्यी संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी ज्या खेळाडूंची अपेक्षा होती त्यातील बऱ्याच खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही. जयदेव उनाडकत, राहुल तेवतिया तसेच हर्षल पटेल यांना डावलले गेल्याने क्रिकेट चाहत्यांनी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जमलंय ना! श्रीलंका दौऱ्यात ‘या’ गोष्टी भारतीय संघासाठी ठरु शकतात फायदेशीर
श्रीलंकेत आपली कामगिरी दाखवण्यासाठी भारतीय संघाचा ‘यंगीस्थान’ सज्ज, वाचा या दौऱ्याबद्दल सर्वकाही
अमेरिकन रेसलर जॉन सीना आहे विराट कोहलीचा चाहता? ‘ही’ जुनी पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल