आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा स्तर हे सध्या वाढला आहे. भारतीय संघाकडे आता अनेक युवा खेळाडूंचा भरणा आहे. आता भारतीय संघाचा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास चिंता वाटणार नाही कारण, भारतीय संघाने ‘बेंच स्ट्रेंथ’ मजबूत केली आहे. हेच आहे की, भारतीय संघ आता एकाच वेळी दोन संघ वेगवेगळ्या देशांच्या मैदानात उतरवू शकतो.
हो, तुम्ही जे वाचलत ते खरे आहे. भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंडला गेला असून तिकडे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध ५ कसोटीची मालिका खेळणार आहे. तर दुसरा मर्यादीत षटकांचा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्याला जाणार असून कर्णधारपदाचा धुरा शिखर धवनकडे देण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल या संघाचा प्रशिक्षक कोण तर, आपण घेऊयात या लेखातून कसा असेल भारताचा श्रीलंका दौरा आणि त्याचे प्रशिक्षक कोण?
भारतीय संघ श्रीलंका दौर्यावर १३,१६ आणि १८ जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यानंतर २१,२३, आणि २५ जुलै रोजी टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. या दौऱ्यावर जाणाऱ्या २० भारतीय खेळाडूंची नावे जाहीर झाली असून. या संघाचे प्रशिक्षक असेल तो म्हणजे राहुल द्रविड. या संघात खूप नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकॅडेमि (NCA)चा प्रमुख राहुल द्रविड जो भारतीय ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघांचे प्रशिक्षक राहिला आहे. राहुल द्रविड दुसऱ्यांदा भारतीय संघासोबत प्रशिक्षकाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे. गेले कित्येक वर्ष भारतीय संघात पदार्पण करणारे खेळाडू आहेत ज्यांना द्रविडचे मार्गदर्शन मिळालेले आहे. द्रविडने आजवर खूप चांगले चांगले खेळाडू तयार केले आहे.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनातच पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, मयंक अग्रवाल आणि ईशान किशन यांसारखे खेळाडू तयार झाले. संजू सॅमसन सारख्या खेळाडूला द्रविडने कठीण आणि दबावखाली कसे क्रिकेट खेळायचे शिकवले. त्यामुळेच सर्व भारतीय खेळाडूंचे राहुल द्रविड सोबत ताळमेळ चांगला जमतो. म्हणून या दौऱ्यावर राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून उपस्थिती खूप मोलाची ठरणार आहे. यातील असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना किंवा भारत अ संघाकडून खेळताना द्रविडचे मार्गदर्शन घेतले आहे.
एवढेच नाही, तर ३५ वर्षीय धवनकडे कर्णधारपदाचा धुरा देण्यात आली आहे. धवन भारतीय संघाचा एकदिवसीय आणि टी -२० सामन्यांचा नियमित सदस्य आहे. धवनकडे १४२ एकदिवसीय सामन्याचा अनुभव आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने ५९७७ धावा केल्या आहेत. धवन सोबत सलामीला पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल पर्याय आहेत. हे दोघेही आक्रमक फलंदाज आहे. ह्या दौऱ्यामध्ये धवन कशी कर्णधाराची भूमिका बजावतो या गोष्टीकडे सर्वांच लक्ष लागून राहणार आहे.
भारतीय संघाकडे काही अनुभवी खेळाडूसुद्धा आहेत जसे की, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल. फिरकी गोलंदाजीची मुख्य धुरा या दोघांकडे असण्याची जास्त शक्यता आहे, परंतु, सध्या दोघेही फॉर्ममध्ये नसून कोणाला संधी मिळेल यावर अजूनही प्रश्न चिन्ह आहे.
अष्टपैलू खेळाडू हार्दिकला सुद्धा आपला फॉर्म परत आणण्यासाठी ही मालिका खूप महत्वाची असणार आहे. गेल्या आयपीएल सामन्यापासून हार्दिकची फलंदाजी सुद्धा थंडावली आहे. बघण्यास उत्सुकता असेल की हार्दिक काही कमाल करतो का?
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेत आपली कामगिरी दाखवण्यासाठी भारतीय संघाचा ‘यंगीस्थान’ सज्ज, वाचा या दौऱ्याबद्दल सर्वकाही
अमेरिकन रेसलर जॉन सीना आहे विराट कोहलीचा चाहता? ‘ही’ जुनी पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल
श्रीलंका दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर, टी नटराजन यांना मिळाले नाही टीम इंडियात स्थान, ‘हे’ आहे कारण