---Advertisement---

हा खेळ आकड्यांचा! ‘हा’ भारतीय गोलंदाज नेहमीच ठरतो न्यूझीलंडला त्रासदायक

On: शनिवार, जून 12, 2021 2:03 AM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षित सामन्यात एकमेकांशी दोन हात करतील. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर हा सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्यात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो.

अश्विनची न्यूझीलंड विरुद्ध दमदार कामगिरी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ कशी प्लेइंग इलेव्हन निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघात चार वेगवान गोलंदाजांना संधी देऊन एकच फिरकीपटू खेळवला जाण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापनाने असा निर्णय घेतल्यास हा एकमेव फिरकीपटू रविचंद्रन अश्विन असेल. त्यामुळे, अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघाबाहेर बसावे लागू शकते.

रविचंद्रन अश्विन याने न्यूझीलंड विरुद्ध आत्तापर्यंत नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी खूप प्रभावी आहे. सहा कसोटी सामन्यांच्या ११ डावांमध्ये त्याने आतापर्यंत या संघाविरुद्ध एकूण ४८ बळी घेतले आहेत. न्यूझीलंड संघाविरूद्ध एका डावात त्याची सर्वोत्तम कामगिरी ५९ धावांत ७ बळी तर, सामन्यात सर्वोत्तम कामगिरी त्याने १४० धावांत १० बळी कशी आहे. न्यूझीलंडविरूद्ध त्याने ६ वेळा डावात ५ बळी घेतले आहेत. या सामन्यांमध्ये त्याची सरासरी १६.९७ तर, इकॉनॉमी रेट ३.०७ आहे.

अश्विनची इंग्लंडमधील एकूण कामगिरी खराब
भारतीय उपखंडात आपल्या फिरकीच्या तालावर भल्याभल्यांना नाचणाऱ्या रविचंद्रन अश्विनची इंग्लंडमधील कामगिरी अत्यंत खराब आहे. त्याने आतापर्यंत दोन वेळा इंग्लंडचा दौरा केला असून यामध्ये त्याने सहा सामने खेळले आहेत. या सहा सामन्यात ३२.९३ च्या खराब सरासरीने तो फक्त १४ बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे. अश्विन अष्टपैलू म्हणून जरी संघात खेळला तरी, इंग्लंडमध्ये फलंदाजीतही तो अपयशी ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत इंग्लंडमधील मैदानांवर २३२ धावा बनवल्या आहेत. त्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश झाला ‘हा’ खेळाडू, शेअर केली भावनिक पोस्ट

जमलंय ना! श्रीलंका दौऱ्यात ‘या’ गोष्टी भारतीय संघासाठी ठरु शकतात फायदेशीर 

श्रीलंकेत आपली कामगिरी दाखवण्यासाठी भारतीय संघाचा ‘यंगीस्थान’ सज्ज, वाचा या दौऱ्याबद्दल सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---