भारतीय महिला हॉकी संघात स्थान मिळवण्याचे अनेक युवा हॉकीपटूंचे स्वप्न असते. त्यासाठी ते प्रचंड मेहनतही करतात.मात्र प्रत्येक खेळाडूला संधी मिळतेच असं नाही. ओडिसाच्या एका युवा महिला हॉकीपटूने जिद्द नाही चिकाटीच्या बळावर वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी भारतीय महिला हॉकी संघात स्थान मिळवले. तिने या संघातील आपले अनुभव सांगितले आहे.
मी नीतिमत्ता राखून माझे कार्य केले- रश्मिता
ओडिसाची युवा हॉकीपटू रश्मिता मिंज हिने 18 व्या वर्षीच भारतीय वरिष्ठ माहीला हॉकी संघात पदार्पण केले. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “सन 2016 मध्ये वरिष्ठ हॉकी संघात पदार्पण केले तेव्हा मी खरोखरच लहान होते आणि तेव्हापासून या संघात खेळणे माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. परंतु, मी नीतिमत्ता राखून माझे कार्य केले आणि सर्व राष्ट्रीय शिबिरांमध्ये मी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले.
..तेव्हा मनात शंका येते
“जेव्हा राष्ट्रीय संघात आपली निवड होत नाही, तेव्हा मनात शंका येते. संघातील माझ्या भूमिकेबद्दल आणि माझ्याकडून काय अपेक्षा आहे याविषयी मुख्य प्रशिक्षक सोजर्द मारिजणे माझ्याशी बोलले याबद्दल मी त्यांची आभारी आहे,” असेही पुढे बोलताना रश्मिता म्हणाली.
भारतीय संघाकडून अनेक पदके जिंकायचेत
तिच्या भविष्याबद्दल बोलताना रश्मिता म्हणाली की, “मला वाटते की या क्षणी माझे वय 22 वर्षे आहे. कमी वयाचा मला नक्कीच फायदा होईल. मला माहित आहे की मी बरीच वर्षे हॉकी खेळू शकते. मी अजूनही संघासाठी चांगले योगदान देऊ शकते. सन 2017 मध्ये जपानमधील काकामिगहारा येथे महिला आशिया चषक स्पर्धेमध्ये आम्ही सुवर्णपदक जिंकले होते. तो एक चांगला क्षण होता. भारतीय संघाकडून अधिक पदके जिंकण्याची संधी मला मिळवायची आहे.”
वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळण्यासाठी मिळवायची संधी
“बर्याच तांत्रिक बाबींवर मला काम करायचे आहे आणि माझी शारीरिक तंदुरुस्ती सुधारायची आहे. संघाच्या वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळण्याची मला अधिक संधी मिळवायची आहे, जेणेकरून खेळाबद्दलच्या विविध पैलूंबाबत आणि खेळाच्या बारीक सारीक गोष्टींबाबत मला शिकायला मिळेल” असेही पुढे बोलताना रश्मिता म्हणाली.
महत्त्वाच्या बातम्या –
“अनुभवी खेळाडूंमुळे मला खूप फायदा झाला”, भारताच्या नवोदित हॉकीपटूची प्रतिक्रिया
आजारी असलेल्या ‘या’ दिग्गज हॉकीपटूला सुनील गावसकर यांचा मदतीचा हात
खेळाडू क्रिकेटचे सामने खेळून घालवतात वेळ, भारतीय हॉकीपटूने एसएआयमध्ये राहण्याचा सांगितला अनुभव