भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे की जर युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत पुन्हा पुन्हा चूका करत असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. पंतने मागील काही सामन्यात चूकीचे फटके मारुन बाद झाल्याने निराश केले होते. तो त्रिनिदादला वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या एका वनडे सामन्यातही पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
याबद्दल शास्त्री म्हणाले, ‘आम्ही त्याला यावेळी सोडले. पण त्रिनिदादमध्ये तो ज्याप्रकारे फटका मारुन पहिल्याच चेंडूवर बाद बाद झाला, तसा फटका तो पुन्हा खेळला तर मात्र त्याला याबद्दल सांगितले जाईल. तुमच्याकडे प्रतिभा असो किंवा नसो तूम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.’
तसेच स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, ‘हे तितकेच साधे आहे. कारण तूम्ही स्वत:लाच सोडा पण संघालाही निराश करत आहात. जेव्हा तूमच्या समोर तूमचा कर्णधार दूसऱ्या बाजूला फलंदाजी करत असतो आणि आपण धावांचा पाठलाग करत असतो, त्यावेळी थोडे समंजसपणे क्रिकेट खेळण्याची गरज असते.’
शास्त्रींनी पंतकडे कौशल्य असल्याचे मान्य केले असले तरी त्याला त्याच्या फटकांच्या निवडीवर आणि निर्णय घेण्याकडे लक्ष्य केंद्रीत करावे लागेल, असे सुचवले आहे.
शास्त्री म्हणाले, ‘कोणीही त्याची शैली बदलण्याचा विचार करत नाही. विराट म्हणाल्याप्रमाणे सामना समजून घेणे, परिस्थिती समजून घेणे आणि फटक्यांची निवड महत्त्वाची आहे. जर त्याने त्याकडे लक्ष दिले तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. त्याने खूप आयपीएल खेळले आहे. तो शिकेल. आता त्याने पुढे येऊन खेळण्याची वेळ आली आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही म्हटले आहे की पंतने सामन्यातील परिस्थिती ओळखून खेळावे एवढीच त्याच्याकडून अपेक्षा आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल ४७ वर्षांनंतर ऍशेस मालिकेत घडली ‘ही’ गोष्ट
–प्रो कबड्डीत कोणालाही न जमलेला ‘तो’ विक्रम परदीप नरवालने करुन दाखवला!
–पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडचा विजय; मालिकेतही साधली बरोबरी