मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा भारतीय संघासोबतचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. शास्त्रींना मोठ्या काळासाठी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. सध्या त्यांनी समालोचकाच्या रूपात पुन्हा पुनरागमन केले आहे. परंतु इंग्लंडच्या प्रशिक्षकपदासाठी शास्त्री इच्छुक असल्याच्याही चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. आता शास्त्रींनी स्वतः या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी या मुद्यावर मत स्पष्ट केले. रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “अरे नाही आता हा रस्ता ओलांडून जायचे नाहीये. भारतीय संघासोबत सात वर्ष एक पूर्णवेळ नोकरी करणे, वर्षातील ३०० दिवस दररोज १.४ अब्ज लोकं तुम्हाला न्याय देत असतात, ज्याचा परिणाम तुमच्यावर होतो. त्याला शुभेच्छा, जो या पदावर मोठ्या काळासाठी टिकून राहील.” जो रुटने काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. शास्त्रींच्या मते रुटनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स जर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बनला, तर त्याचे प्रदर्शन देखील सुधारू शकते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
इंग्लंडचे अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड सध्या संघातून बाहेर आहेत. शास्त्रींच्या मते या दोन्हीनाही संघात पुन्हा सामील केले गेले पाहिजे. “जर ते फिट आहेत, विकेट्सच्या शोधात आहेत, तर तुम्ही याकडे एका चांगल्या दृष्टीकोनातून पाहू शकता. खूप पुढचा विचार करताना प्रत्येक देश ही चूक करतो. १०० फूट लांब पाहणे खूप सोपे आहे, पण त्या लोकांचे समर्थन केले पाहिजे, ज्यांनी तुमच्यासाठी चांगले प्रदर्शन केले आहे.” दरम्यान, अँडरसन आणि ब्रॉड जोडीने इंग्लंडसाठी आतापर्यंत तब्बल ११७७ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. त्यांचा अनुभव संघाच्या खराब काळात नक्कीच कामी येऊ शकतो.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे वय सध्या ५९ वर्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनात संघाने खेळलेल्या १४ कसोटी मालिकांपैकी १० मालिका जिंकल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात भारताला कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा संघ देखील बनला. यादरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मायदेशात दोन कसोटी मालिका जिंकल्या. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अशी कामगिरी करणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराट फलंदाजीत फेल, पण फिल्डिंगमध्ये तेज! बोल्टचा कॅच घेताना दाखवली चित्त्यासारखी चपळाई
रियान परागचा फलंदाजीतच नाही, तर फिल्डिंगमध्येही जलवा; कॅलिस, गिलख्रिस्टच्या पंक्तीत स्थान
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा बाद होणारा बेंगलोर दुसरा संघ, पहिल्या क्रमांकावर ‘या’ संघाचे नाव