भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहेत. याच कारणास्तव त्यांना आगामी टी-20 विश्वचषक देखील खेळता येणार नाहीये. विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत बुमराह आणि जडेजा संघासाठी उपलब्ध नसल्यामुळे त्याचे नुकसान होताना नक्कीच दिसू शकते. परंतु भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मात्र या अडचणीच्या काळात देखील संधी शोढता येईल, असे वाटते.
रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांच्या मते जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) टी-20 विश्वचषक खेळणान नसले तरी, यादरम्यानच्या काळात भारताला एखादा नवीन खेळाडू मिळू शकतो, ज्याच्यात संघाला विजेतेपद मिळवून देण्याची धमक असेल. आगामा टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला देखील आहे. बुमराहचा बदली खेळाडू अद्याप निश्चित केला गेला नाहीये. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याला बुमराहच्या जाही विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते, अशी दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे जडेजाच्या जागी अक्षर पटेल (Axar Patel) याला विश्वचषक संघात निवडले गेले आहे.
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक बुमराह आणि जडेजाच्या अनुपस्थितीत देखील संघ चांगले प्रदर्शन करू शकतो. माध्यमांशी बोलताना शास्त्री म्हणाले, “हे दुर्भाग्यपूर्ण आहे की, एवढे क्रिकेट खेळले जात आहे आणि खेळाडूंना दुखापत होत आहे. बुमराह दुखापतग्रस्त आहे, पण ही दुसऱ्या एखाद्यासाठी संधी असू शकते. दुखापत झाल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही.”
“मला वाटते आपल्याकडे पुरेस राखीव खेळाडू आहेत आणि आपल्याकडे एक चांगला संघ आहे. मला नेहमीच वाटते की, जर तुम्ही उपांत्या सामन्यापर्यंत पोहोचलात, तर ही स्पर्धा कुणाचीही होऊ शकते. प्रयत्न चांगली सुरुवात करण्याचा, उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याचा आणि शक्यतो सर्वांना माहिती आहे की, विश्वचषक जिंकण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी ताकद आहे. बुमराह संघात नसने, जडेजा संघात नसने अडचणीची बाब आहे. पण ही नवीन चॅम्पियनला शोढण्याची संधी देखील आहे,” असे शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘कतार वर्ल्डकप शेवटचा’, मेस्सीचे निवृत्तीबाबत मोठे भाष्य
Asia Cup 2022: टॉस जिंकत पाकिस्तानची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
Asia Cup 2022: टॉस जिंकत पाकिस्तानची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन