युवा भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, चांगली कामगिरी करूनही नोव्हेंबर 2020 मध्ये सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे चाहतेच नव्हे, तर क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांनीही निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. अशातच भारतीय संघांचे प्रशिक्षक रवि शात्री यांनी सूर्यकुमारची निवड न होण्याचं कारण सांगितलं आहे. ते टाइम्स नाऊ या वृत्तपात्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
संघ फलंदाजांनी परिपूर्ण
भारतीय संघांचे प्रशिक्षक म्हणाले की “याक्षणी भारतीय संघ फलंदाजांनी परिपूर्ण आहे आणि सूर्यकुमार त्यात स्थान मिळवताना दिसत नाही. यामुळेच आम्ही तरुणांना संयम राखण्यास सांगत आहोत. संघात सूर्यकुमार सारखेच तीन ते चार तरुण खेळाडू आहेत. जेव्हा आपल्याकडे प्रतिभावान आणि अनुभवाने परिपूर्ण संघ असतो, तेव्हा तरूणांना संघात स्थान मिळवणे अवघड जाते.”
माझ्या काळात संघात स्थान मिळवणे अवघड -रवि शास्त्री
“मला माझ्या कारकीर्दीतील तो काळ अजूनही आठवतो जेव्हा भारतीय संघात पहिल्या क्रमांकापासून ते सहाव्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजांचे संघात स्थान पूर्णपणे निश्चित होते. त्यावेळी मधल्या फळीत एखाद्या खेळाडूला संघात स्थान मिळविणे खूप अवघड होते. असे असूनही, असे बरेच फलंदाज होते जे देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करून राष्ट्रीय संघाचा दरवाजा ठोठावत होते.”
तरुण खेळाडूंनी बाळगावा संयम
शास्त्री म्हणाले की “मी सर्व तरुण खेळाडूंना एवढेच सांगतो की त्यांनी संयम बाळगावा आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा त्यांनी ती संधी दोन्ही हातांनी घट्ट धारावी. त्यावेळी आपण संधी गमावू नये.”
तसेच शास्त्री यांनी तरुणांना निराश होऊ नका आणि सकारात्मक मनःस्थिती कायम ठेवण्याचा सल्ला दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
सुर्यकुमारला केलेलं ट्विट माझ्यासाठीही केलं असतं तर माझंही करियर वाचलं असतं!
-विराटला विराटच्याच भाषेत सुर्यकुमार यादवने दिले उत्तर, पाहा व्हिडीओ
-‘विराट कोहली तर साक्षात देव!’ सुर्यकुमार यादवचा ४ वर्षांपुर्वीचा ट्विट जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख –
विरेंद्र सेहवागची ‘ती’ शतकी खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही!
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?