---Advertisement---

ना ना…! कोहली आणि संघाला कमी लेखण्याची चूक करू नका; शास्त्रींची इंग्लंडला चेतावणी

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 12:38 AM
Virat-Kohli-Ravi-Shastri
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघावर चहुबाजूंनी टीका केली जात होती. मात्र, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला लीड्सवरील पराभवाला विसरून ओव्हलवर शानदार कामगिरी करण्यासाठी संघाला प्रोत्साहित केले आहे. यावर त्यांनी लॉर्ड्सवर झालेल्या विजयाची प्रेरणा घ्यायला सांगितली आहे.

दरम्यान, शास्त्री यांनी मान्य केले आहे की, तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचे ७८ धावांवर सर्वबाद होणे, हा त्या सामन्यातील निर्णायक क्षण ठरला. मात्र ही मालिका अजूनही कायम असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

‘स्टारगेजिंग’ या पुस्तकाच्या प्रचारादरम्यान टाइम्स नाव भारतसोबत बोलताना शास्त्री म्हणाले, “हे खूप सोप्प आहे. तुम्ही फक्त लॉर्ड्सवरील विजयाबाबत विचार करा. मागील लीड्सवरील सामना तुम्ही विसरून जा. मला माहितीये की हे केवळ बोलणे सोपे आहे. मात्र, आपल्याला चांगल्या क्षणांना देखील आठवणीत ठेवले पाहिजे. खेळात अशा गोष्टी होत राहतात.”

पुढे बोलताना शास्त्री म्हणाले, “लॉर्ड्समध्ये इंग्लंड मजबूत स्थितीत होता. मात्र, तरीही आम्ही त्यांच्यावर विजय मिळवला. मागील सामन्यात त्यांनी (इंग्लंडने) चांगली गोलंदाजी केली. यामुळे आमच्यावर पहिल्या दिवसापासूनच दबाव बनला होता. पहिल्या दिवशीच आम्ही बॅकफूटवर आलो होतो.”

तसेच शास्त्रींनी भारताच्या दुसऱ्या डावातील २७८ धावांवर समाधान व्यक्त केले. यावर बोलताना ते म्हणाले, “आम्ही दुसऱ्या डावात झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहिल्या डावात ७८ धावांवर सर्व बाद झाल्यामुळे तो सामना तिथेच हातातून निसटला होता. असे असले तरी अजूनही या मालिकेत आम्ही कायम आहोत.”

विराट कोहली आणि भारतीय संघाला कमी न लेखण्याचाही शास्त्रींनी सल्ला दिला
याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, “ही मालिका आता १-१ ने बरोबरीत आहे आणि आम्ही विदेशात खेळत आहोत. यामुळे सध्या इंग्लंड दबावात आहे. त्यांना त्यांच्या मायभूमीत जिंकायचे आहे. जेव्हा ते भारतात आले होते, तेव्हा आम्ही तेच केले होते जे आम्हाला करायचे होते. सध्या त्यांना त्यांच्या मायभूमीचा फायदा घ्यायचा आहे. मात्र, आम्हाला देखील चांगले प्रदर्शन करावे लागेल यात काही शंका नाही. म्हणून विराट कोहली आणि भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक करू नका.”

तसेच तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने चौथ्या कसोटी सामन्यात संघात मोठे बदल होण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे भारतीय संघ फिरकीपटू आर अश्विनला खेळण्याची संधी देऊ शकतात. त्याऐवजी भारतीय संघ एका वेगवान गोलंदाजाला आराम देण्याची शक्यता आहे. चर्चांनुसार ईशांत शर्मा तो गोलंदाज असू शकतो.

मात्र, बुधवारी (१ सप्टेंबर) भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणने सांगितले याबाबत होते की, “ओव्हलच्या कसोटी सामन्यात अश्विन खेळणार की नाही, हे नाणेफेक होण्याच्या आधी ठरवण्यात येईल. त्याआधी भारतीय संघ खेळपट्टीचा आढावा घेऊन अंतिम ११ विषयी निर्णय घेईल.”

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी लंडनच्या ओवल मैदानात गुरुवार (२ सप्टेंबर) पासून सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –
मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर रवी शास्त्री काय करणार? ऐका त्यांच्याच तोंडून
अश्विनच्या सहभागाच्या अंदाजानेच इंग्लंडचा उडालाय थरकाप, ओव्हलच्या खेळपट्टीशी करणार छेडछाड!
अष्टपैलू जडेजा पूर्णपणे फिट, मग अश्विन परत बाकावर? गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---