---Advertisement---

बॉल टॅम्परिंगविषयी बोलणाऱ्या मायकल वॉनला रवी शास्त्रींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले वाचाच

On: शुक्रवार, फेब्रुवारी 10, 2023 5:41 PM
---Advertisement---

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजा याने भारतीय संघासाठी पुनरागमन केले. दुखापतीनंतर पहिलाच सामना खेळताना जडेजाने गुरुवारी (9 फेब्रुवारी) पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. मात्र, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन मीडियाकडून जडेजावर चेंडूशी छेडझाड केल्याचा आरोप केला गेला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही या व्हिडिओवर मत व्यक्त करत जडेजावर टीका केली. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वॉनला प्रत्युत्तर दिले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघांतील या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अडकल्याने ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 177 धावा करून सर्वबाद झाला. जडेजाने टाकलेल्या 22 षटकांमध्ये 47 धावा दिल्या आणि सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनासाठी त्याचे कौतुक होत असले, तरी ऑस्ट्रेलियन मीडियाकडून त्याच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप होत आहे.

जडेजा आणि मोहम्मद सिराज यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत सिराजने जडेजाच्या बोटावर काहीतरी लावताना दिसत आहे. याच एका व्हिडिओच्या आदारे जडेजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला गेला. दरम्यान या सामन्याच्या रेफरींना स्वतः कर्णधार रोहित शर्मा आणि जडेजाला याविषयी विचारणा केली, ज्यावर जडेजा म्हणाला त्याचे बोट तानले गेल्यामुळे त्याने यावर मलम लावला. जडेजाने स्पष्टीकरण दिल्यानंतर रेफरींनी हा मुद्दा इथेच संपवला. मात्र, मीडियामध्ये याच्या चर्चा सुरू आहेत.

फॉक्स क्रिकेटने याविषयी केलेल्या ट्वीटवर मायकल वॉन (Michael Vaughan ) याने मत मांडले. वॉन म्हणाला की, “तो त्याच्या स्पिनिंग फिंगरवर काय लावत आहे? मी याआधी असे काहीच पाहिले नाहीये.” यावर शास्त्री लाईव्ह समालोचन करताना म्हणाले की, “मी याविषयी जास्त काही ऐकले नाहीये. पण माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की, मॅच रेफरी याविषयी काही बोलले का? त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे. दुसरा प्रश्न असा की, यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला काही अडचण आली का? हे प्रकरण मिटले आहे. तर आपण यावर बोललेल्या एखाद्या व्यक्तिवर का चर्चा करावी. तसेच अशा प्रकारच्या खेळपट्टीवर तुम्हाला काही करण्याची गरजच नाहीये. चेंडू मनाने स्पिन होत आहे.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एक बाद 77 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 7 बाद 321 धावा केल्या. रोहित शर्मा याने कर्णधारपदाला साजेसे प्रदर्शन करत शतक ठोकले आणि संघाची धावसंख्या उचांवली. (Ravi Shastri’s reply to Michael Vaughan on ball tampering controversy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

दुसरा दिवस रोहित-जडेजाच्या नावे! नागपूर कसोटीत टीम इंडियाकडे 144 धावांची आघाडी, मर्फीची एकाकी झुंज
‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---