भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या पहिला सामना खेळला जात आहे. त्यातील पहिल्या दिवसाचा खेळ नागपूर येथे समाप्त झाला आहे. या पहिल्या दिवसाच्या खेळात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 15.5 षटकात 42 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमधील एक नवा विक्रम प्रस्थापित केला. कसोटी इतिहासात 3000 धावा आणि 450 विकेट्स घेणारा रविचंद्रन अश्विन हा एकमेव आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे.
नागपूर कसोटीत सर्वांचे लक्ष अश्विन कशी कामगिरी करतो याकडे होते. कारण, ऑस्ट्रेलियन संघ भारतात आल्यावर त्यांनी अश्विनच्या गोलंदाजीचा सराव करण्यासाठी खास गोलंदाज पाचारण केला होता. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांनीही त्याची स्तुती केली होती.
प्रत्यक्ष सामना सुरू झाल्यानंतर अश्विन हा सर्वात अखेरीस गोलंदाजीसाठी आला. सुरुवातीला त्याला फारसे यश आले नाही. मात्र, जम बसलेल्या ऍलेक्स केरी याला त्रिफळाचीत केल्यानंतर त्याने आणखी दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. केरीला बाद करून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा व 450 बळी मिळवणारा चौथा क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. यापूर्वी अशी कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न व इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड यांनी केली आहे. तसेच आशिया खंडात अशी कामगिरी करणारा अश्विन पहिला क्रिकेटपटू ठरला.
अश्विनची कसोटी कारकीर्द
रविचंद्रन अश्विनने (Ravichandra Ashwin) 89 कसोटी सामन्यातील 127 डावांमध्ये 27.41च्या सरासरीने 3043 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 5 शतके आणि 13 अर्धशतकेही मारली आहेत. 124 ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजी करतांना 89 सामन्यात 167 डावांमध्ये 24.23 च्या सरासरीने एकुण 452 विकेट्स घेतल्या. कसोटी सामन्यात 59 धावांमध्ये 7 विकेट्स ही त्याची एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.
(Ravichandran Ashwin Becomes First Asian Who Took 450 Test Wickets And 3000 Test Runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चित्त्याची चपळाई दाखवत भरतने करून दिली धोनीची आठवण; करिअरची पहिली स्टंपिंग होतेय जोरदार व्हायरल
ख्वाजाची विकेट घेण्याचा आनंद सिराजपेक्षा रोहित-राहुलला, रिऍक्शन जिंकेल तुमचेही मन; पाहा व्हिडिओ